खाकी वर्दीत 'नराधम', 5 वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसानेच केला बलात्कार

खाकी वर्दीत 'नराधम', 5 वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसानेच केला बलात्कार

कुंपन शेत खात असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. एका 31 वर्षीय पोलिसानेच पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

अमरावती,4 ऑक्टोबर: कुंपन शेत खात असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. एका 31 वर्षीय पोलिसानेच पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंकुश माणिकराव बनसोड (वय-31) असे नराधमाचे नाव असून तो एसआरपीएफ गट क्रमांक 9 मध्ये कार्यरत आहे.

या प्रकरणी चिमुकलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराचा गुन्ह्याखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंकुश माणिकराव बनसोड याला अटक करण्यात आली आहे. तो येथील एसआरपीएफ गटाला कार्यरत आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तो त्याच्या घरी पोहोचला. घरी गेल्यानंतर परिसरातच राहणारी एक पाच वर्षीय चिमुकली खेळत असताना तिच्या घरात गेली. या वेळी अंकुशच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून त्याने मुलीवर अत्याचार केले. मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली.

पाळणा घरातल्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणारी अशीच घटना ठाणे शहरात दोन दिवसांपूर्वी घडली होती. बँक ATM बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या एकाने चिमुरडीवर बलात्कार केला होता. ही चार वर्षांची मुलगी पाळणाघरात creche असताना या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. दशरथ कांबळे या 42 वर्षांच्या सुरक्षा रक्षकानेच हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. सकाळी या मुलीच्या आईने तिला नेहमीच्या पाळणाघरात (Creche)नेऊन सोडले आणि ती कामाला गेली होती.

दशरथ कांबळे तिथून जवळच असलेल्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असे. तो पाळणाघरात आला आणि या मुलीला बरोबर घेऊन गेला. तिला गंमत दाखवतो, काही नवे शिकवतो असे सांगून त्यानं तिला आपल्याबरोबर यायला सांगितले. ती मुलगी कांबळेच्या मागे गेली तेव्हा त्याने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला.

चार वर्षांची चिमुरडी संध्याकाळी आईबरोबर घरी गेली, तेव्हा घाबरलेली होती. आईला तिच्या वागण्यात बदल जाणवला. तिने तिच्याकडे नीट चौकशी केली तेव्हा त्या मुलीने घडलेला प्रसंग सांगितला. आईने तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. ठाणे पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली.

VIDEO:प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या