अमरावतीत ध्येय वेड्याने बांधलं चक्क प्लास्टिकच्या वेस्टेज बाटल्यांचं घर

अमरावतीत ध्येय वेड्याने बांधलं चक्क प्लास्टिकच्या वेस्टेज बाटल्यांचं घर

अमरावतीत एका ध्येय वेड्याने चक्क प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून टू बीएचके घर बांधले आहे. आता हे घर अमरावती जिल्ह्यात उत्सुकतेचा विषय बनलेला आहे.

  • Share this:

अमरावती, 18 ऑगस्ट- स्टील, लोखंडाचा वापर करून सर्वजण आपल्या स्वप्नातील घर साकारतात. वर्षानुवर्षे टिकावे यासाठी महागडे साहित्य बांधकामात वापरतात. मात्र, अमरावतीत एका ध्येय वेड्याने चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांपासून टू बीएचके घर बांधले आहे. आता हे घर अमरावती जिल्ह्यात उत्सुकतेचा विषय बनलेला आहे.

अमरावती जिल्ह्यातील राजुरा या छोट्याशा गावात राहणारे नितीन ऊसगावकर यांनी त्यांच्या कल्पक दृष्टीतून प्लास्टिकच्या बाटल्यांपासून टूमदार घर बांधले आहे. घरात 24 तास हवा खेळती राहण्याची व्यवस्था तसेच घरात भरपूर सूर्यप्रकाश येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अनोखे घर उभारण्यासाठी उसगावकर यांना तब्बल दोन वर्षे लागली. या घरामध्ये तब्बल सोळा हजार प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.

अमरावतीमधील राजुरा गावात हे घर आहे. आपल्या वास्तविक घराच्या बांधकामासाठी अशी तांत्रिक माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी अनेक साधनांचा वापर केला. यामध्ये त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून काही माहिती मिळवली. त्या आधारावर त्यांनी 16000 प्लास्टिक बाटल्या गोळा करून घराचे बांधकाम पूर्ण केले.

बांधकाम खर्चात 30 टक्के बचत...

विटांचे घर बांधण्यासाठी जेवढा खर्च लागतो त्याच्या तुलनेत प्लास्टिकच्या बाटल्यांच्या घराच्या बांधकामामध्ये 30 टक्के बचत झाली. परिसरात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे प्रदूषणावर होणाऱ्या परिणामांवरही यामुळे मात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे एकंदरीत प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनविलेल्या घराला 'इको फ्रेंडली' घर सुद्धा म्हणता येईल.

अमरावती शहरालागत बांधलेले हे अनोखे घर पाहण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत. विद्यार्थी घराची पाहणी ते अतिशय चिकित्सक पद्धतीने करत आहे. आपण पाणी पिऊन बाटली फेकून देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, या बाटल्यांचा वापर करून घर बांधण्यात आले आहे. त्यामुळे लोकांनी सुद्धा याचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करायला हवे, असा संदेश विद्यार्थी देत आहेत.

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 06:41 PM IST

ताज्या बातम्या