मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या लोढ्यांमुळे ग्रामीण भागात दहशत, कोरोना रुग्णांच्या मृत्यूने खळबळ

मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या लोढ्यांमुळे ग्रामीण भागात दहशत, कोरोना रुग्णांच्या मृत्यूने खळबळ

आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भाग आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

  • Share this:

 बुलडाणा18 मे:  शहरांमधून खासकरून पुणे आणि मुंबईतून येणाऱ्या लोढ्यांमुळे ग्रामीण भागात दहशत निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भाग आता कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईहून आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याने खामगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या त्या ६५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा आज.१८ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यु झाला.

ही महिला ही मुंबई येथून ११ में रोजी स्थानिक जिया काँलनी भागातील तीच्या नातेवाईकांकडे आली होती. तेव्हापासूनच तिची प्रकृती ढासाळलेली होती. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्या महिलेला सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तिच्या स्वँब नमुन्याचा अहवाल पाँझिटिव्ह आला होता.

यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. तर तिच्या संपर्कातील १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचा अहवालाची प्रतिक्षा असतांनाच सोमवारी कोराना बाधीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी, एकमेव ग्रीन झोन जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव

महाराष्ट्रातील कोरोनाचं थैमान काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात आज तब्बल 2033 नवे रुग्ण आढळले असून यामध्ये राजधानी मुंबईतील 1185 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही राज्यातील स्थिती नियंत्रणात येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 21 हजारांवर गेली आहे. शहरात आज कोरोनामुळे 23 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 757 जणाचा मृत्यू झाला आहे.तर आज 504जण कोरोनामुक्त झाले असून आजवर मुंबईतील 5516 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

अचानक सुरु झाला विद्युत प्रवाह, शॉक लागून पिता-पुत्राचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू

 राज्यात 51 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 23, नवी मुंबईमध्ये 8, पुण्यात 8, जळगावमध्ये 3, औरंगाबाद शहरात 2, अहमदनगर जिल्ह्यात 2,नागपूर शहरात 2, भिवंडी 1 तर पालघरमध्ये 1 मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील 1 मृत्यू मुंबईत झाला आहे.

मृत्यूंबद्दल डिटेल्स –

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 35 पुरुष तर16 महिला आहेत. आज झालेल्या 51 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 21 रुग्ण आहेत तर 19 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षांखालील आहे. या 51 रुग्णांपैकी 35 जणांमध्ये ( 68%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1249 झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2, 82, 194 नमुन्यांपैकी 2, 47, 103 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 35, 058 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

 

First published: May 18, 2020, 11:29 PM IST

ताज्या बातम्या