यवतमाळ 16 मे: राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच काही दिलासा देणाऱ्या बातम्याही आहेत. राज्यात सुरुवातीला ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते त्यात यवतमाळचा समावेश होता. आता मात्र जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. 45 कोरोना बाधित रुग्णांपैकी 38 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 वर आली असून ही यवतमाळ करांसाठी दिलासा दायक बातमी आहे.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये 45 पॉझिटिव्ह रुग्ण भरती होते. त्या रुग्णांपैकी 38 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 वर आली आहे.
हे रुग्ण उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या 38 पैकी 3 जणांना संस्थात्मक विलागिकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित 35 जण गृह विलागिकरणात राहणार आहे. विशेष म्हणजे 24, 25 आणि 26 एप्रिल या दरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली.
त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता 98 वर गेला होता. यापैकी तब्बल 91 जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला यश आले. एकूणच यवतमाळ जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर असून जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी अतिशय तत्परतेने कारवाई करत उपाय योजना केल्यामुळे प्रशासनाला हे यश मिळाल्याचं बोललं जात आहे.
केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय, संरक्षण क्षेत्रात भारत देणार स्वबळावर टक्कर
अधिकाऱ्यांच्या बैठका घेत सगळ्यांना कामाला लावलं. त्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करता आले. तसेच त्यांना आयसोलेट करत क्वारंटाइन करण्यात आल्याने कोरोनाचा प्रसार थांबविण्यात यश आलं. आता त्यांना मुंबई-पुण्याहून येणाऱ्या लोकांच्या लोढ्यांमुळे चिंता निर्माण झाली आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवर कर्मचारी आणि शिक्षकांची मदत घेत त्यांनी बाहेरून येणाऱ्यांची नोंदणी करण्यात येत असून त्यांना क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं आहे.
एक चहाची तलफ आणि वाचलं 24 जणांचं आयुष्य, काही लोकांचा प्रवास ठरला अखेरचा