Home /News /maharashtra /

मुलाने app डाउनलोड करणं पडलं भारी, वडिलांच्या खात्यामधून झाली 9 लाखांची चोरी

मुलाने app डाउनलोड करणं पडलं भारी, वडिलांच्या खात्यामधून झाली 9 लाखांची चोरी

कॉलवरील व्यक्तीने जसं जसं सांगितलं, तसं सगळं अशोक यांच्या मुलाने केलं. कॉल करणाऱ्याने स्वत:ला तो कस्टमर केयर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचं सांगितलं. कॉल करणाऱ्याने, अशोक यांच्या मुलाला, मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं.

पुढे वाचा ...
    नागपूर, 9 नोव्हेंबर : देशात ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. ज्या वेगात डिजिटल पेमेंट वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक ऑनलाईन फसवणूकीचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. नागपुरातील कोराडीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून अज्ञाताने 9 लाख रुपये चोरी केले आहेत. यासाठी वापरण्यात आलेल्या प्रक्रियेने सर्वच जण हैराण आहेत. नागपूरच्या कोराडीमध्ये अशोक मनवते नावाचे व्यक्ती राहतात. बुधवारी त्यांचा 15 वर्षांचा मुलगा, त्यांचा मोबाईल वापरत होता. त्यावेळी त्यांच्या फोनवर एक कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने अशोक यांच्या मुलाला सांगितलं की, त्याच्या वडिलांच्या डिजिटल पेमेंट अकाउंटचं क्रेडिट लिमिट वाढवण्यात आलं आहे. या ई-कॉमर्स साईटच्या 2 कोटी युजर्सचा डेटा लीक;30 लाख रुपयात विक्रीची माहिती त्यानंतर त्या कॉलवरील व्यक्तीने जसं जसं सांगितलं, तसं सगळं अशोक यांच्या मुलाने केलं. कॉल करणाऱ्याने स्वत:ला तो कस्टमर केयर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचं सांगितलं. कॉल करणाऱ्याने, अशोक यांच्या मुलाला, मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं. जसं मुलाने मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड केलं, त्याचवेळी कॉल करणाऱ्याने अशोक यांच्या अकाउंटमधून 8.95 लाख रुपये चोरी केले. अलर्ट! डेबिट, क्रेडिट कार्डाबाबत अशाप्रकारे कॉल आल्यास वेळीच व्हा सावधान, अन्यथा ऍप्लिकेशनद्वारे पैसे कसे ट्रान्सफर झाले - अशोक यांचं बँक अकाउंट मोबाईलमध्ये असणाऱ्या ऍपशी जोडलेलं होतं. अशात ज्यावेळी नवं ऍप डाउनलोड केलं, त्यावेळी चोरट्याला त्यांच्या बँक अकाउंटपर्यंतचा संपूर्ण ऍक्सेस मिळाला. त्यानंतर त्याने संपूर्ण पैसे ट्रान्सफर केले. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणात आयटी ऍक्टअंतर्गतही रिपोर्ट लिहिण्यात आला आहे. अशाप्रकारचं प्रकरण समोर आल्यानंतर लोकांना ऑनलाईन फसवणूकीबाबत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
    Published by:Karishma
    First published:

    पुढील बातम्या