Home /News /maharashtra /

अमरावती: Online परीक्षेचा गोंधळ, युवासेनेचा राडा; कुलगुरूंच्या ऑफिसची तोडफोड VIDEO

अमरावती: Online परीक्षेचा गोंधळ, युवासेनेचा राडा; कुलगुरूंच्या ऑफिसची तोडफोड VIDEO

केवळ अमरावतीच नव्हे तर मुंबई आणि पुणे विद्यापीठांमध्येही हा गोंधळ बघायला मिळाला आहे. अनेक परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यामुळे तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

अमरावती 23 ऑक्टोबर: कोरोनाचा संकट काळात त्रासलेल्या विद्यार्थ्यांना Online परीक्षेत आलेल्या अडचणींमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे युवसेनाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या ऑफिसमध्ये राडा केला. कुलगुरूंची खुर्ची आणि इतर सामानांचीही तोडफोड केली त्यामुळे विद्यापीठात एकच गोंधळ उडाला. अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेचा पुरता गोंधळ उडालेला आहे विद्यापीठाला तिसऱ्यांदा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहे. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तीव्र संताप आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी प्रो मार्क या गुणवत्ता नसलेल्या कंपनीसोबत हातमिळवणी करून ऑनलाइन परीक्षेचा कंत्राट दिलं असा आरोप होत आहे. या कंपनीची क्षमता नसल्याने विद्यापीठ प्रशासन तोंडघशी पडलं व विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा जाब विचारायला गेलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या खुर्चीची व दालनाची तोडफोड केली तसेच कुलगुरूंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. मार्च महिन्यापासून सगळीच कॉलेजेस बंद आहेत. सगळा अभ्यास ऑनलाईन सुरू आहे. अशातच राहिलेल्या परीक्षाही ऑनलाईन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र अनेक विद्यापीठांमध्ये या परीक्षांचा पुरता फज्जा उडाला. ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं ते योग्य नव्हतं असा आरोप आता होत आहे. भारतात इंटरनेटचा बोलबाला असताना ज्या पद्धतीने या परीक्षा घेतल्या गेल्या ती पद्धत अतिशय वाईट होती असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. केवळ अमरावतीच नव्हे तर मुंबई आणि पुणे विद्यापीठांमध्येही हा गोंधळ बघायला मिळाला आहे. अनेक परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यामुळे तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: अमरावतीamravati

पुढील बातम्या