मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, नंतर तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, नंतर तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

 त्या तरुणाने तिला गार्डनमध्ये बोलावलं होतं. दोघांची भेट झाल्यानंतर काही क्षणातच त्याने तिच्या पोटात चाकू मारुन तिची हत्या केली.

अमरावती 06 जानेवारी : एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन मुलीची तरुणाने हत्या केल्याची खळबळजनक घटना धामणगाव शहरात घडलीय. वय 17 असलेली ही तरुणी शहरातल्या एका महाविद्यालयात 12वीमध्ये शिकत होती. त्या तरुणाने तिला गार्डनमध्ये बोलावलं होतं. दोघांची भेट झाल्यानंतर काही क्षणातच त्याने तिच्या पोटात चाकू मारुन तिची हत्या केली. नंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू मारल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात घडली असून यात तरुणीचा घटनास्थळी मृत्यू झालाय. तर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही तरुणी जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगाव मधील सेफला हायस्कूल मध्ये 12 व्या वर्गात शिकत होती. आज सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान शाळेत जात असताना एका तरुणाने येऊन तिच्या पोटात चाकूने सपासप वार केले तर तरुणाने स्वत:च्या पोटात चाकू मारून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. यात तरुणीचा म्रुत्यु झाला असून गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत कायम बोललं जातं. सर्व देशभरही त्याविरुद्ध आक्रोश आहे. हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर त सर्व देशभर संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र महिलांवरत्या अत्याचारांच्या घटना थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीत.

धक्कादायक! थर्टीफर्स्टला केलं प्रपोज आणि 5 दिवसातच गर्लफ्रेंडला घातल्या गोळ्या

केवळ कायदा आणि सुव्यवस्थेमुळे ही परिस्थिती बदलणार नाही तर त्यासाठी तरुणांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तर आपली मुलं काय करतात ते कुठल्या मार्गाने जात आहेत यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त केलं जातंय.

First published: