एक महिन्याच्या 'छकुली'चा गळा आवळून खून..मृतदेह फेकला गायीच्या गोठ्यात

एक महिन्याच्या 'छकुली'चा गळा आवळून खून..मृतदेह फेकला गायीच्या गोठ्यात

राज्याची उपराजधानी पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने हादरली आहे.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,19 सप्टेंबर: राज्याची उपराजधानी पुन्हा एकदा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने हादरली आहे. कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील धम्म बुद्धविहारजवळ एक महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून तिचा निर्घृण खून करण्यात आला आहे. एवढेच नाही तर चिमुकलीचा मृतदेह नजीकच्या गायीच्या गोठ्यातील चिखलात फेकण्यात आला. ही घटना बुधवारी(18 सप्टेंबर) मध्यरात्री 2 वाजेदरम्यान घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खूनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात...

पोलिसांनी मृत छकुलीची आई व आजीला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. मौदा तालुक्यात येणाऱ्या अरोली गावातील एका गरीब मोलमजुरी करणाऱ्या अनिल कनोजे यांच्या कुटुंबात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी छकुलीचा जन्म झाला. ही गोंडस छकुली जन्माला आल्याने कुटुंबात आनंदाची लहर पसरली होती. मात्र, हिची प्रकृती बरी राहत नसल्याने तिला उपचारार्थ कामठी येथील सायली चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी दिवसाला हजार रुपयावर खर्च येणार असल्याची सूचना डॉक्टरांनी केली होती. तरी कुटुंबीयांनी उपचार सुरूच ठेवला. काही दिवसांत ती उपचारात चांगला प्रतिसाद देऊ लागली. अरोलीवरून कामठीला यायचे म्हणून काल 18 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता मृत छकुलीची आई पायल अनिल कनोजे, वडील अनिल उत्तम कनोजे, काका सुनील उत्तम कनोजे, आजी पुस्तकला उत्तम कनोजे हे कामठीला पोहोचले. सायली हॉस्पिटलला येऊन छकुलीची तपासणी करून नातेवाईक असलेल्या रणाळा येथील करण मुरारी बर्वेकर यांच्या कुटुंबात रात्रभर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गावाकडे प्रस्थान करणार असल्याचे नियोजित होते. यानुसार रात्रभर सगळे कुटुंबीय सदस्य निवांत झोपेत असताना छकुलीची आई पायल मध्यरात्री 2 वाजता उठली असता कडेला असलेली छकुली दिसत नसल्याने चिंताग्रस्त झाले. शोधाशोध करूनही कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने एकच चर्चेचा विषय ठरवत कुटुंबात चिंता वाढली. या घटनेची माहिती त्वरित नवीन कामठी पोलीस स्टेशनला देण्यात आली.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन ते घटनास्ठळी पोहोचले. पोलिसांची संशयाची सुई छकुलीच्या आई व आजी भोवती फिरत होती. पोलिसी खाक्या दाखवताच आईने छकुलीची आजी तिला ज्या मार्गाने घेऊन गेली त्या दिशेने पायल पोलिसांना घेऊन गेली. रणाळा गावातील रंजित लोणारे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत पांडुरंग गणेर यांचे गायी-म्हशी बांधलेल्या गोठ्यात चिखलाने भरलेल्या खड्ड्यात छकुलीचा मृतदेह फेकल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात पंचनामा केला. घटनेचे गूढ रहस्य उलगडण्यासाठी तसेच सदर घटनेतील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी संशयित मृतक छकुलीची आई पायल कनोजे व आजी पुस्तकला कनोजे या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस दोघींची कसून चौकशी करत आहेत. या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही मिळवण्याचे पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 19, 2019, 3:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading