सरकारी ऑफिसमध्ये दारूच्या नशेत अधिकारी टुल्ल!

ऑन ड्युटी दारू पिऊन कार्यालयात झोपा काढणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 09:33 PM IST

सरकारी ऑफिसमध्ये दारूच्या नशेत अधिकारी टुल्ल!

संजय शेंडे, अमरावती 20 सप्टेंबर : उपकोषागार अधिकारी  आपल्याच कार्यालयात ऑन ड्युटी दारू ढोसून टेबल खाली पडून  असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अमरावती जवळच्या तिवसा मधील उपकोषागार कार्यालयात हा प्रकार उघड झालाय. अजय सोनटक्के असं दारू ढोसलेल्या उपकोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. अमरावतीच्या तिवसा येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाजूला हे उपकोषागार कार्यालय आहे.आज दुपारच्या सुमारास काही नागरिक कार्यालयात गेले असता त्यांना हा प्रकार दिसलाय.

उपकोषागार कार्यालयात दारू पिउन टेबल खाली पडून असलेले उपकोषागार आढळून आल्यानं सगळ्यांनीच या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यामुळे ऑन ड्युटी दारू पिऊन कार्यालयात झोपा काढणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

दगडाने ठेचून एकाची हत्या.. मृतदेहाला घेऊन दुचाकीवरून जात होते तिघे, तितक्यात...

बुलडाणा : घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांत गरोदर महिलेसह 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेत इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात राहणारे शेख कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घराशेजारील घराची भिंत कोसळलीय. ढिगाऱ्या खाली दबून शेख कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले आहेत. जखमीवर मेहकरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु असताना ही घटना घडली.

...तर महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनते समोर फाशी घेईन - धनंजय मुंडे

Loading...

बुलडाणा जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती,नंतर रात्रीपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तेव्हा जिल्ह्यातील मेहेकर येथील इमामवाडा चौकात राहणारे शेख कुटुंब गाढ झोपेत असताना मातीची भिंत शेख कुटुंबावर कोसळली. कुटुंबातील पाच जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी आरडाओरड केली आणि मदतीला सुरुवात केली. पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीखाली दबलेल्या पाचही जणाना बाहेर काढले. सगळ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यापैकी तिघांना डॉंक्टरांनी मृत घोषित केले. दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...