Home /News /maharashtra /

‘पोलिसांचा पंटर’ म्हटल्याचा राग, नागपूरमध्ये गुंडाची दगडाने ठेचून हत्या

‘पोलिसांचा पंटर’ म्हटल्याचा राग, नागपूरमध्ये गुंडाची दगडाने ठेचून हत्या

सागर हा जेलमधून सुटून काही दिवसांपूर्वीच बाहेर आला होता. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे. शहरातल्या जरीपटका भागात त्याची प्रचंड दहशत होती

नागपूर 12 नोव्हेंबर: गुंडाची हत्या होण्याची घटना नागपूरमध्ये (Nagpur crime) नवी नाही. आता पुन्हा एकदा आणखी एका गुंडाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. या गुंडाच्या मित्रानेच रागाच्या भरात त्याची हत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. सागर जाधव असं गुंडाचं नाव आहे. जितेंद्र पाटील या त्याच्या मित्राने त्याची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. सागरने जितेंद्र याला पोलिसांचा पंटर म्हटलं त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं. ते दोघेही नेशत होते अशी माहितीही पुढे आली आहे. सागर हा जेलमधून सुटून काही दिवसांपूर्वीच बाहेर आला होता. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे. शहरातल्या जरीपटका भागात त्याची प्रचंड दहशत  होती. गुंडांची टोळी बनवून तो दहशत माजवत होता. बुधवारी रात्री सागर आणि जितेंद्र यांची भेट झाली. त्यानंतर दोघांनीही मद्यपान केलं. त्यानंतर बोलत असताना सागरने जितेंद्र याला तु पोलिसांचा पंटर आहे असं म्हटलं. जितेंद्र हाच पोलिसांना माहिती देतो असा सागर आणि त्याच्या टोळीला संशय होता. जितेंद्र याला पोलिसांचा पंटर म्हटल्याचा राग आला. त्या नंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. नंतर त्याचं रुपांतर भांडणात झालं. मध्यरात्री हा सगळा प्रकार सुरू होता. ते भांडण एवढं विकोपाला गेलं की जितेंद्र याने नशेच्या भरात मोठा दगड घेऊन तो सागरच्या डोक्यात घातला. यात सागर गंभीर जखमी होऊन कोसळला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. जितेंद्रने तोपर्यंत तेथून पळ काढला होता. सकाळी सागर मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी जितेंद्र जाधव याला अटक केली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या