Network नसल्याने नागरीकांचा संताप, अकोल्यात पालिकेसमोर 'मोबाईल फोडो' आंदोलन

Network नसल्याने नागरीकांचा संताप, अकोल्यात पालिकेसमोर 'मोबाईल फोडो' आंदोलन

'अकोला महानगरपालिका प्रशासन अकोला शहरातील सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून त्यांच्या मुलभूत अधिकारावर गदा आणत आहे.'

  • Share this:

अकोला 23 जानेवारी : अकोला शहरामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे, या कारणे सर्व सामान्य जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शासनाची सर्व कामे ऑनलाईन झाल्यामुळे इंटरनेट कनेक्शन विस्कळीत झाले आहे. सर्व बँकेचे ऑनलाईन व्यवहारही ठप्प झाले आहे. या त्रासाला कंटाळून अकोलेकर नागरिकांनी अकोला महापालिका आयुक्तांच्या दलनासमोर मोबाईल फोडो आंदोलन केलं. महानगरपालिकेने मोबाईल कंपन्यांवर कार्यवाही केल्याने हा संपूर्ण प्रकार घडला. अकोला महानगरपालिका प्रशासन अकोला शहरातील सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून त्यांच्या मुलभूत अधिकारावर गदा आणत आहे अकोला महानगरपालिका प्रशासन व मोबाईल कंपन्यांनी यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा व भविष्यांमध्ये असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी व सामान्य अकोलेकरांना त्यांच्या मुलभूत अधिकार पासून वंचित ठेवू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

डिजिटल व्यवहाराला चालणा देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सध्या सर्वच क्षेत्रात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. सरकारच्या सर्वच योजनाही ऑनलाईन झाल्या असून त्याची कागदपत्रही ऑनलाईनच भरावी लागतात. त्यामुळे स्मार्टफोनवर इंटरनेट असणं ही काही आता चैनीची गोष्ट न राहता आवश्यक गरज झालीय.

शेतकऱ्यांनाही अनेक गोष्टी या आता इंटरनेटच्या माध्यमातूनच उपलब्ध होतात. त्याचबरोबर संदेशांची देवाण-घेवाणही ही अत्यावश्यक गरज बनल्याने नागरीकांचे दररोजचे विषयही त्यावर अवलंबून असतात. त्याचा मोठा फटाक व्यावसायीकांनाही बसतो त्यामुळे नागरीकांनी हे मोबाईल फोड आंदोलन केलंय.

हेही वाचा..

VIDEO अमित ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होताच आई शर्मिला आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी

राज ठाकरेंकडून 'राजमुद्रे'चा गैरवापर, मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल

अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार, असा होता प्रतिसाद

 

First published: January 23, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या