सत्ता जाताच नितीन गडकरींचा फोटो भाजपच्या बॅनरवर झळकला

सत्ता जाताच नितीन गडकरींचा फोटो भाजपच्या बॅनरवर झळकला

आता सत्ता गेल्यानंतर गडकरींना पुन्हा एकदा बॅनर्सवर स्थान मिळू लागल्याने हा पराभवातून घेतलेला धडा असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, नागपूर 15 डिसेंबर : गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात भाजपच्या बॅनर्सवर बहुतांश वेळा नितीन गडकरींचा फोटो गायब झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व वाढल्याने सगळ्या बॅनर्सवर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसोबत गडकरींचीच छबी झळकत होती. फडणवीसांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यानही गडकरींचा फोटो गायब होता. मात्र शनिवारी नागपुरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाठिमागे जे बॅनर लावण्यात आलं होतं त्यात गडकरींचा फोटो दिसल्याने हा सत्ता गेल्याचा तर परिणाम नाही ना अशी चर्च रंगली होती. दोन्ही नेते नागपूरचेच असल्याने नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या शीतयुद्धाच्या बातम्या येत असतात. मात्र दोन्ही नेत्यांनी त्यावर कधी भाष्य केलं नाही. उलट अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकमेकांच्या कामाचं कौतुक करतानाच दिसले. पडद्यामागे मात्र वेगळीच चर्चा ऐकू येत होती. महाराष्ट्रात फडणवीसांचं वजन वाढल्याने गडकरींनीही महाराष्ट्रात फारसं लक्ष घातलं नव्हतं.विधानसभेच्या निकालानंतरही महिनाभर सत्तेचा जो खेळ रंगला होता त्यात महाराष्ट्राचे दिग्गज नेते असूनही गडकरी कुठेच नव्हते. आता सत्ता गेल्यानंतर गडकरींना पुन्हा एकदा बॅनर्सवर स्थान मिळू लागल्याने हा पराभवातून घेतलेला धडा असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस वापरणार 'हे' अस्त्र!

राज्य विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे आजपासून सुरवात होतेय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीर सावरकर यांच्या अपमानचा मुद्दा विधिमंडळा बाहेर आणि सभागृहात आणण्याची रणनीती भाजपने आखलीय. तर सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात झालेल्या भ्रष्टाचारचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. रविवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत त्याचे संकेतही मिळाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे विधान केलं होतं त्याला आक्षेप घेत राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावरून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपने दिलाय. तर याच मुद्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीतीही भाजपने आखलीय.

अजित पवारांचा भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत विमान प्रवास, राजकीय चर्चांचं 'टेक ऑफ'

हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. नागपूर अधिवेशन हे राजकीय दृष्ट्या कायम वादळी आणि खळबळजनक ठरलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन कसं पार पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं हे सरकार असल्याने त्यांच्यात मतभेद आहेत हे आता काही नवं राहिलेलं नाही. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून वाद निर्माण झालाय. त्याचा फायदा घेत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीसांनी रणनीती तयार केली असून त्याचे पडसाद आता विधिमंडळात बघायला मिळणार आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 15, 2019, 11:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading