नागपूर, 25 ऑगस्ट : नागपूरमध्ये कोरोनाने उद्रेक मांडला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या परिस्थितीशी पालिका प्रशासन लढा देत आहे. परंतु, कोरोनाशी लढा देत असताना पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
तुकाराम मुंढे यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have come in my contact for last 14 days to get tested.
I am Working from Home to control #pandemic situation in Nagpur.
तसंच, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी स्वत: ला होमक्वारंटाइन करून घेतले आहे. शासनाने जे नियम घालून दिले आहे, त्याचे पालन करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर गेल्या 14 दिवसांमध्ये माझ्या संपर्कात जे कुणी आले असेल त्यांनी समोर यावे आणि माहिती द्यावी. लगेच कोरोनाची चाचणीही करून घ्यावी, असं आवाहनही मुंढे यांनी केले.
तुकाराम मुंढे हे होम क्वारांटाइन झाले आहे. घरातूनच ते शहरातील कोरोनाची परिस्थितीवर काम करणार आहे.
राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या सात लाख गाठणार
दरम्यान, Corona रुग्णांची संख्या 7 लाखांजवळ पोहोचली तरी धोका अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा 11,015 नव्या Covid positive रुग्णांची भर पडली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 14,219 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. याचा अर्थ नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनी अधिक आली आहे.
राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 6,93,398 झाली आहे. यातले 5,02,49 जण बरे झालेले आहेत. मृत्यूचा आकडा 22465 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,68,126 रुग्ण आहेत. ही अॅक्टिव्ह रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे.