अनैतिक संबंध लपवण्यासाठी दीड दिवसाच्या नवजात शिशुला नाल्यात फेकले

माता न तू वैरिणी..! रस्त्यालगतच्या नाल्यात नवजात शिशु मृतावस्थेत आढळून आले...

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 10:55 AM IST

अनैतिक संबंध लपवण्यासाठी दीड दिवसाच्या नवजात शिशुला नाल्यात फेकले

वर्धा,23 ऑक्टोबर:माता न तू वैरिणी..! दीड दिवसांच्या नवजात शिशुला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगणा तालुक्यातील मांगली शिवारातील रस्त्यालगतच्या नाल्यात नवजात शिशु मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना काल, 22 ऑक्टोबर सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली. अनैतिक संबंध लपवण्यासाठी या शिशुची हत्या करण्यात आली की स्त्रीभ्रूण हत्या याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मांगली समोरून मांडवघोराडकडे वळणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्याच्या पुलाखाली एक नवजात शिशु पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळले. त्यानंतर त्यांनी तत्काळ याची सूचना हिंगणा पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिस उपनिरीक्षक अनील धानोरकर, हवालदार बतखल आणि अरुण इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने नवजात शिशुला बाहेर काढले. त्या बाळाला अंगड-टोपर व डायपर लावले होते. त्याचा जन्म एक ते दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिस त्या बाळाच्या मातेचा शोध घेत आहेत.

भैरवनाथाच्या सोनुबाई तीर्थकुंडात नवजात अर्भक फेकून माता पसार..

दरम्यान, गेल्या महिनाभरापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भैरवनाथाच्या सोनुबाई तीर्थकुंडात नवजात अर्भक फेकून माता पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. परंडा तालुक्यातील सोनारी गावातील भैरवनाथ मंदिरासमोरील सोनुबाई तीर्थमध्ये एका निर्दयी मातेने आपले नवजात अर्भक फेकले होते. स्त्री जातीचे हे अर्भक असून ते पाण्यावर तरंगताना दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी महिलेचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला होता.

VIDEO : विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी दिला बेदम चोप

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...