मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग? नागपूरमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग? नागपूरमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत

नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

नागपूर, 26 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ऐतिहासिक समीकरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली. तसंच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात आली. राज्यात घडलेल्या या अनोख्या प्रयोगानंतर स्थानिक पातळीवरही हे तीनही पक्ष एकत्रच लढतील, असं सांगितलं जात होतं. मात्र नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. नागपूर महापालिकाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला आहे. नागपूर शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी माहिती देत स्पष्ट केलं आहे, की महाविकास आघाडीच्या बॅनरवर जरी महापालिका निवडणुका आपण लढत असलो तरी सन्मानजनक जागा आपल्याला न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 'एकला चलो रे' या भूमिकेत दिसणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. स्वबळावर लढण्याबाबत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याचा दृष्टीने वरिष्ठ नेत्यांनी सूचना केली आहे. तसंच स्थानिक पातळीवर महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्याची तयारी देखील वरिष्ठांनी दाखवली आहे, अस दावा शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आगामी काळातील पालिका निवडणुकांत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्रपणे लढतील, असं म्हटलं होतं. मात्र आता नागपूरमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
First published:

Tags: Nagpur, NCP

पुढील बातम्या