दारूतस्करी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक

दारूतस्करी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याला अटक झाल्यानं राष्ट्रवादीची प्रतिमा जिल्ह्यात मालिन झालीय.

  • Share this:

हैदर शेख, चंद्रपूर 17 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि चंद्रपूर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष दीपक जैस्वाल यांना दारु तस्करीच्या आरोपाखाली आज पोलिसांनी अटक केली. जैस्वाल यांच्यासह त्याच्या 2 साथीदारांसह अटक करण्यात आलीय. पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईने बापट नगर येथील त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कार मधून 35 पेटी देशी आणि 15 पेटी विदेशी दारु जप्त करण्यात आलीय. यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी बदनामी झाली आहे.

त्यांच्या घरापुढे असलेल्या एका कारमध्ये देशी-विदेशी दारूच्या पेट्या पोलिसांना सापडल्या. या दारूची किंमत साडेपाच लाखांवर असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी सांगितलं. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याला अटक झाल्यानं पक्षाची प्रतिमा मालिन झाली असून, काही सामाजिक संघटनांनी जयस्वाल यांच्यावर तडीपारीच्या कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.

भाजपप्रवेश लांबला कारण... नारायण राणेंनी केला मोठा खुलासा

7वीच्या विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

विद्यार्थी आणि शिक्षिकाचं नातं हे पवित्र आणि प्रेमाचं समजलं जातं. मात्र मुंबईत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका अल्पवयीन मुलाने आपल्या ट्युशनच्या शिक्षेकेची हत्या केल्याचं उघड झालंय. किरकोळ कारणांवरून त्याने शिक्षेकेवर हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. त्यात त्या शिक्षिकेचा मृत्यू झाला. रागाच्या भरात केलेल्या या हल्ल्याने त्या विद्यार्थ्याने शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासलीय. मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही घटना घडली असून या घटनेने सर्व परिसर हादरून गेलाय.आयेशा अस्लम हुसिये (वय 30) या शिक्षिका गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरात राहतात. आयेशा या ट्युशन घेऊन आपलं घर चालवत होत्या. त्यांच्याकडे आरोपी मुलगा (वय 12) हा ट्युशनला येत असे. तो सातव्या वर्गात होता अशी माहिती दिली जातेय.

शिवसेनेत प्रवेश करणार का? उर्मिला मातोंडकरांनी दिलं हे स्पष्टीकरण!

त्याने आयेशांकडे काही पैशांची मागणी केली. आपल्या आईला घरात काही सामान आणयचं आहे त्यासाठी पैसे हवे असल्याचं त्याने आयेशा यांना सांगितलं. मात्र आपल्याकडे पैसे नाहीत असं शिक्षिकेने सांगितल्यानंतर या मुलाला राग आला. काही वेळात तो पुन्हा त्यांच्याकडे चाकू घेऊ आला आणि पैशाची मागणी करत तो वाद घालू लागला. शिक्षिकेने पुन्हा नकार देताच त्याने आपल्या जवळच्या चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षिकेच्या पोटात आणि पाठिवर त्याने सपासप वार केले.

महाराष्ट्राचा महासंग्राम : गडचिरोलीमध्ये भाजपचंच वर्चस्व राहणार का?

या हल्ल्यात आयेशा या गंभीर जखमी झाल्या आणि प्रचंड रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतलंय. त्याच्याविरुद्ध 302 IPC CR No. 436/19  या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला सुधारगृहात पाठवलंय. मात्र घटनेने खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2019 06:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading