33 लाखांचे बक्षीस असलेल्या दलमच्या कमांडरसह सर्व जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

33 लाखांचे बक्षीस असलेल्या दलमच्या कमांडरसह सर्व जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

चातगाव दलमच्या सर्व माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. माओवादी चळवळीच्या इतिहासातली पहिली घटना आहे.

  • Share this:

महेश तिवारी,(प्रतिनिधी)

गडचिरोली,9 ऑक्टोबर: चातगाव दलमच्या सर्व माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. माओवादी चळवळीच्या इतिहासातली पहिली घटना आहे. दलमचा कमांडर जहाल माओवादी राकेश आचला याच्यासह उपकमांडर देवीदास आचला आणि सर्व माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यात तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे. राकेश आचला याच्यावर 30 तर देवीदास आचलावर 9 गुन्हे दाखल आहेत. या माओवाद्यांवर एकूण 33 लाखांचे बक्षीस होते.

धानोरा आणि एटापल्ली तालुक्याच्या सीमावर्ती भागात हे चातगाव दलम सक्रीय आहे. सिंदेसूर आणि गोवीन या दोन चकमकीनंतर दलमच्या सदस्यांचा आत्मविश्वास डगमगल्याने त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला होता.राकेश उर्फ गणेश सनकू आचला (वय-34), देविदास उर्फ मनिराम सोनू आचला (वय-25), रेश्मा उर्फ जाई दुलसु कोवाची (वय-19), अखिला उर्फ राधे झुरे (वय-27), शिवा विज्या पोटावी (वय-22), करुणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (वय-22) आणि राहुल उर्फ दामजी सोमजी पल्ले (वय-25) अशी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची नावे आहे. या माओवाद्यांवर एकूण 33 लाखांचे बक्षीस होते.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकचमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी आतापर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच एकूण 33 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस असलेल्या चातगाव दलमच्या 7 माओवाद्यांनी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकावडे यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित माओवादी हे दलममध्ये काम करताना महिलांवर होत असलेले अत्याचार तसेच दलममधील माओवादी हे अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवून नेऊन त्यांना बळजबरीने त्यांना दलममध्ये भरती करत होते, अशी कबुली या सर्व माओवाद्यांनी दिली आहे. हिंसाचाराचा मार्ग सोडून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची मनिषाही या सगळ्यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंच्या पहिल्या सभेत पाणीच पाणी, पाहा हा LIVE VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: October 9, 2019, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading