अमित ठाकरेंच्या आधी आणखी एका दिग्गज नेत्याच्या मुलाची राजकारणात दमदार एन्ट्री

अमित ठाकरेंच्या आधी आणखी एका दिग्गज नेत्याच्या मुलाची राजकारणात दमदार एन्ट्री

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित हा 23 जानेवारीला राजकारणात सक्रिय प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. त्या आधीच राज्याच्या राजकारणात एका दिग्गज नेत्याच्या मुलाची दमदार एन्ट्री झालीय.

  • Share this:

नागपूर 08 जानेवारी : राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणूकांचे निकाल आज लागत आहेत. या निवडणुकीत अनेक धक्के राजकीय पक्षांना बसत आहेत. महाविकास आघाडीमुळे जवळपास सर्वच ठिकाणी समिकरणं बदलली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने बरीच उलथापालथ झालीय. अनेक ठिकाणांची समिकरणं बदलली आहेत. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना राज्यात अनपेक्षीतपणे गृहमंत्रीपद मिळालं. त्यामुळे त्यांची लॉटरी लागल्याचं बोललं जातंय. खातेवाटपात मोठं यश मिळाल्यानंतर आता त्यांचा मुलगा सलील देशमुख हा विजयी झालाय. त्यामुळे देशमुखांचा डबल धमाका झाला असून काही वर्ष मागे पडल्यानंतर देशमुख आता पुन्हा स्पर्धेत आले आहेत.

सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा मधून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश समजला जातोय. अनिल देशमुख यांनी सलीलला विधानसभेत तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न केले होते. पण त्यात त्यांना यश आलं नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत सलील यांना जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतवून त्यांनी विजय खेचून आणलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित हा 23 जानेवारीला राजकारणात सक्रिय प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. त्या आधीच राज्याच्या राजकारणात एका दिग्गज नेत्याच्या मुलाची दमदार एन्ट्री झालीय.

ZP Election Result : अकोल्यात वंचित आघाडीवर तर वाशिममध्ये भाजप-शिवसनेत रस्सीखेच

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नागपुरात गड राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक ही भाजपसाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात होते. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले.

Osmanabad ZP Election Result: शिवसेनेच्या 'तानाजीं'ची बंडखोरी, भाजपला दिली साथ

नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.

या विजयावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. हा आनंदाचा दिवस असून राष्ट्रवादीच्या कामाची पावती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ठिकाणी प्रचार केला त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags:
First Published: Jan 8, 2020 03:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading