धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

त्याच्यापासून दूर व्हावं म्हणून तरुणीने ती नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर पंकज तिला भूलथापा देऊन आपली शरीर सुखाची इच्छा पूर्ण करत राहिला.

  • Share this:

हर्षल महाजन, नागपूर 11 ऑगस्ट :  नागपूरात महिलांवरच्या अत्याचाराची आणखी एक घटना उघड झालीय. एका तरुणाने विवाहाचं आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्या भामट्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार आहे. नागपूरचं सोनेगाव पोलीस स्टेशन या घटनेचा तपास करत आहे.

पंकज सुनील राऊत असं (वय 27) आरोपीचं नाव आहे. पंकज आणि पीडित तरुणी शहरातल्या एका प्रॉपर्टी डिलरकडे नोकरी करत होते. तिथेच त्यांची ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेत पंकजने तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं आणि त्याने तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर त्याने अनेकदा बलात्कार केल्याचं FIRमध्ये म्हटलं आहे.

प्रेग्नंट तरुणीवर 11 वेळा गँगरेप, बॉयफ्रेंडसमोरच अत्याचार, त्याचीही आत्महत्या

नंतर पंकज लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. त्याच्यापासून दूर व्हावं म्हणून तरुणीने ती नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर पंकज तिला भूलथापा देऊन आपली शरीर सुखाची इच्छा पूर्ण करत राहिला. या संबंधांची वाच्यता केलीस तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो ब्लॅकमेलही करत असे. पंकजने लग्नाला नकार दिल्याने शेवटी तरुणीने पोलीस  स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अॅट्रोसिटी आणि महिला विरुद्ध अत्याचार प्रकरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पंकज फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलंय.

जम्मू काश्मीर मुस्लिम बहुल असल्यानेच '370' हटवलं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने

गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. विविध सामाजिक संघटनांनी जनजागृती मोहिमही सुरू केली असून तरुणींचं प्रबोधन करण्यात येतेय. लग्नाचं आश्वासन दिल्यानंतरही किती प्रमाणात जवळीक वाढवायची याचं भान ठेवणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या