ठाकरे सरकार केवळ 'स्थगिती सरकार', भाजपनं टाकला चहापानावर बहिष्कार

ठाकरे सरकार केवळ 'स्थगिती सरकार', भाजपनं टाकला चहापानावर बहिष्कार

नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न करणे याचा अर्थ नागपूर अधिवेशन हे या सरकारला 'सिरियस' अधिवेशन वाटत नाही.

  • Share this:

विवेक कुलकर्णी,(प्रतिनिधी)

नागपूर,15 डिसेंबर:नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न करणे याचा अर्थ नागपूर अधिवेशन हे या सरकारला 'सिरियस' अधिवेशन वाटत नाही. केवळ वेळकाढूपणाचे धोरण म्हणून हे अधिवेशन कागदोपत्री घेण्याचा फास हे सरकार करत आहे, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. मंत्रीच नाही, मग विषय मांडायचे कुणाकडे, असा टोलाही फडणवीस यांनी सरकारला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

सध्या महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. कारण सुरू असलेली कामं फेरआढावा घेण्यासाठी थांबवण्यात आली आहे. ज्या सरकारमध्ये धोरणांमध्ये सातत्य राहत नाही. राष्टीय पेयजलची कामे, ज्याला केंद्राने 8 हजार कोटींचा आराखडा मंजूर केला आहे, याला स्थगिती सरकारने दिलीय, ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करत भाजपने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सेना आमच्यासोबत राज्यात केंद्रात होती, मंत्रिमंडळ जे निर्णय झाले ते एकमताने झाले होते, विरोध झाला नव्हता. आता हे निर्णय कसे चूक होते हे काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेकडून वदवून घेत आहेत. आमची जेवढी जवाबदारी आहे, तेवढी सेनेची पण आहे, उत्तरे ही सेनेला पण द्यावी लागतील.

शिवसेनेची लाचारी त्यांना लखलाभ..

देशात एकच व्यक्ती अशी आहे, ज्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. ज्या सावकारांबद्दल शिवसेनेची भूमिका सौदेबाजेची आहे. राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. शिवसेनेची लाचारी त्यांना लखलाभ, अशा शब्दांत टीका केली. या सरकरचे मुख्यमंत्री यांनी वारंवार मागणी केली होती की, 25 हजार प्रति हेक्टर, 50 हजार फळबागायत यांना मदत मिळाली पाहिजे. इतर पक्षांच्या नेत्यांनीही यापेक्षा मोठी मागणी केली आहे. आमची अशी अपेक्षा होती की पूर्तता तातडीने करेल. मात्र इतक्या बैठका झाल्या मात्र अवकाळी पाऊस मदतबाबत चर्चा झाली नाही, निर्णय घेतला नाही. आता जी माहिती अली आहे त्याप्रमाणे 93 लाख हेक्टर एवढे नुकसान शेतीचे झाले आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन केलं तर 23 हजार कोटी रुपये या सरकारने स्वतः दिलेला शब्द पाळण्याकरता तातडीने शेतकऱ्यांसाठी रिलीज केले पाहिजेत, आम्ही या अधिवेशनात याबद्दल आठवण करून देणार आहे.

उद्यापासून (16 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधीच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. हे सरकार आल्यानंतर मदत मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा होती. आम्ही काळजीवाहू सरकारमध्ये असताना मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. आता स्मिता निधी वाढवण्याच्या संदर्भात न अध्यादेश काढण्याकरता मान्यता दिली होती. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना या सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे 'स्थगिती सरकार' आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...

- सावरकरांचा अपमान करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही

- चहापानावर भाजपनं बहिष्कार टाकला

- शिवसेनेची लाचारी त्यांना लखलाभ

- राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे

- देशात एकच व्यक्ती अशी आहे ज्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे

- केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही

- ज्या सावकारांबद्दल शिवसेनेची भूमिका सौदेबाजेची आहे

- आम्ही या विषयावर राहुल गांधींना माफ करु शकत नाही

- राहुल गांधीच्या वक्तव्याचे पडसाद उमटणार

- आम्हाला चर्चेची संधी दिली नाही तर आक्रमक भूमिका घेऊ

- सरकारकडून राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल

- शिवसेना आमच्यासोबत सत्तेत होती तेव्हा निर्णय एकमताने झाले

- कर्जाचा आकडा फुगवला जात आहे देवेंद्र फडणवीस यांची टीका

- राज्याच्या आर्थिक स्थितीसंदर्भात दिसाभूल करणारी वक्तव्य केली जात आहेत

- जिथे धोरणांमध्ये सातत्य नसतं तिथे गुंतवणुकीवर परिणाम होतो

- राज्याच्या प्रतिमेवर परिणाम - देवेंद्र फडणवीस

- आता महाराष्ट्र ठप्प - देवेंद्र फडणवीस

- कर्जमाफी आणि सातबारा कोरा हे निर्णय कधी होणार?

- सरकारने स्वत: दिलेला शब्द पाळावा

- मंत्रिमंडळाच्या एकाही बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची चर्चाही झाली नाही

- हे सरकार आल्यानंतर मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती आम्ही काळजीवाहू सरकारमध्ये असताना मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. आता स्मिता निधी वाढवण्याच्या संदर्भात न अध्यादेश काढण्याकरता मान्यता दिली होती.

- सत्तेतल्या तीनही पक्षांमध्ये विसंवाद

- सरकार अधिवेशन गांभिर्यानं घेत नाही - देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

- नागपूर अधिवेशनारपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार न करणं हा सरकारचा वेळकाढूपणा

- देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका

-सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस उलटून गेले

Published by: Sandip Parolekar
First published: December 15, 2019, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading