'चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातल्या नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते'

'चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातल्या नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते'

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात जर भ्रष्टाचार झाला असेल कोणी दोषी असेल तर त्याला कारवाई होणार

  • Share this:

नागपूर,15 डिसेंबर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी नागपुरात उद्यापासून (सोमवार 16 डिसेंबर) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला 'चहापान' प्रथा आहे, 'बहिष्कार चहापान' ही नवी प्रथा सुरू होते आहे. चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातल्या नेत्यांनी तरी चहापानावर बहिष्कार घालायला नको होता. आपले पंतप्रधान एक चहावाले होते, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. येथील नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते, विशेष म्हणजे आज आंतरराष्ट्रीय चहा दिन असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढला.समाजाला न्याय मिळवून देणे हे सरकार आणि पत्रकार या दोघांचे कर्तव्य असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी पत्रकारांना केले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त नाह तर चिंतामुक्त करणार असल्याचे सांगत त्यांच्यासाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासन पाळणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी स्वा. सावरकरांच्या मुद्दयावर देखील भाष्य केले. लोकांना सतत चिंतेत ठेवा आणि कारभार आटपा अशी स्थिती भाजपची असल्याचे ते म्हणाले. देश एक राहील हे सावरकरांचे मत आहे. पण तुम्ही त्या मार्गावर चालत नाही. अल्पसंख्यांकाना बाजूला ठेवता. अल्पसंख्यांक सुरक्षित असतील तर गाठ आमच्याशी आहे, असे पंतप्रधानांनी राज्यकर्त्यांना ठणकावून सांगायला हवे होते. पण तसे झाले नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. छत्रपतींच्या स्मारकामागे कोणी घोटाळा केला असेल तर निंदनीय प्रकार आहे. आमच्याकडे या तक्रारी आल्या आहेत. आम्ही त्यावर लवकरच कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आज नागपुरात आगमन झाले आहे.मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच नागपुरात आल्याने शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असल्याने सक्षम असलेल्या भाजपसारख्या विरोधीपक्षाला सरकारला सामोरे जावे लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे..

- सावरकरांचा मुद्दा उचलून लक्ष विचलीत केले जात आहे.

- देशात अशांतता का पसरली आहे, त्याकडे आधी पाहा.

- कोणत्याही विकास कामाना स्थगिती नाही.

- शेतकऱ्यांना कर्जमुक्त तर करणारच, पण नेहमीसाठी चिंतामुक्तही करणार.

- तिजोरीच्या चाव्या आता माझ्या हाती.

- राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सत्यचित्र राज्यासमोर आणणार.

- आमच्या काही मतामध्ये भिन्नता असेल पण आम्ही राज्यात एकत्र

- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात जर भ्रष्टाचार झाला असेल कोणी दोषी असेल तर त्याला कारवाई होणार

- आपले पंतप्रधान एक चहावाले होते, त्यांचा आम्हाला अभिमान, येथील नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते

- शेतकऱ्यांना कर्जमुक्त नाही चिंतामुक्त करणार , त्यासाठी पावलं उचलणार

- आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, आज चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातल्या नेत्यांनी तरी चहापानावर बहिष्कार घालायला नको होता

- चहापान प्रथा आहे, बहिष्कार चहापान ही नवी प्रथा होते

- जनतेच्या अपेक्षांना खरं ठरू

- शपथविधी होऊन 15 दिवस झाले

- विदर्भातील आणि राज्यातील माता भगिनी यांनी आशीर्वाद द्यावा

- खरी कारकीर्द उद्या पासून सुरू होईल

- शपथविधी होऊन 15 दिवस झाले

- ते आले असते तर आनंद झाला असता

- आमचे मित्र चहापानाला आले नाहीत याचं दुख:

- अस असताना आमचे विरोधी मित्र आले नाही

- चहापानाला विरोधकांनी यायला हवं होतं, सरकार ने कामाला सुरुवात झालेली नाही

- सहा दिवस अधिवेशन असलं तरी , वातावरण आनंदी राहिल- जयंत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 06:48 PM IST

ताज्या बातम्या