नागपुरात भूकबळीनं 2 सख्ख्या बहिणींचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेता सापडला मृतदेह

नागपुरात भूकबळीनं 2 सख्ख्या बहिणींचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेता सापडला मृतदेह

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून भूकबळीतून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

  • Share this:

नागपूर, 07 जानेवारी: नव्या कोरोनासोबत बर्ड फ्लूचं संकट असताना नागपुरात दोन बहिणींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दोन बहिणींचा मृत्यू झाला अयाची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दोन बहिणींचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेनंतर नागपुरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपुरातील कामठी इथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

पद्मा लवटे वय वर्ष 60 आणि कल्पना लवटे वय वर्ष 50 अशी या दोन्ही महिलांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या दोन्ही मनोरुग्ण होत्या अशी देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन बहिणींचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

हे वाचा-दुर्दैवी! पतंगाचा पाठलाग करणाऱ्या मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून भूकबळीतून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा निश्चित होणार आहे. भूकबळीने या दोन बहिणींचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे नागपूर हादरलं आहे.

First published: January 7, 2021, 10:16 AM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading