• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'मला मरू द्या...' Facebook Live करत कलाकाराने कापली हाताची नस, उचललं टोकाचं पाऊल

'मला मरू द्या...' Facebook Live करत कलाकाराने कापली हाताची नस, उचललं टोकाचं पाऊल

Nagpur Artist Suicide: नागपूरमधील एका कलाकाराच्या बाबतीतही एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे

 • Share this:
  तुषार कोहळे, नागपूर, 14 मार्च: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death Case) आत्महत्या या विषयावर विशेष गांभीर्याने बोललं जात आहे. मेंटल हेल्थबाबत देखील चर्चा होत आहे. अशाप्रकारे नैराश्याशी सामना करणाऱ्या, एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तींशी बोलून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. मात्र तरीही अशा काही घटना घडतात त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात. नागपूरमधील (Nagpur) एका कलाकाराच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. (Nagpur Suicide Case). नागपूर शहरातील कलावंत प्रवीण मून याने नैराश्य मुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांना धक्का बसला आहे. आणखी भयंकर बाब म्हणजे या इसमाने  फेसबुक लाईव्ह आत्महत्या (Suicide on Facebook Live) करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी त्याचे मित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने प्रवीणला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रवीण मून याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यावेळी त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्याला वाचावण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा देखील तो मला मरू द्या असंच बडबडत होता. त्याच्या मुलीने देखील हे असं करताना पाहून हंबरडा फोडला. दोन दिवसआधी प्रवीण मुनने त्याच्या सह कलाकारांना सोबत घेऊन पालिका कार्यालयात आंदोलन केले होते. (हे वाचा-सर्वात मोठी बातमी, 'ती' इनोव्हा कार मुंबई पोलीस आयुक्तालया जवळून घेतली ताब्यात!) कोरोना काळात (Coronavirus Pandemic) जगणं कठीण झाल्याने या इसमाने हे टोकांचं पाऊल उचललं. या काळात त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कर्जदारांचे कर्ज फेडणं शक्य नसल्याने आत्महत्या करत असल्याचं त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. घरात भुकमारीची वेळ आली असल्याचं प्रवीण याने म्हटलं आहे, शिवाय कर्जदारांच्या धमक्यांनाही त्याला सामोरं जावं लागत होतं. आता पुन्हा लॉकडाऊन लागल्याने त्याच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे प्रवीणने म्हटलं आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: