नागपूरात चाललं तरी काय? तरुणाने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात महिला जखमी

नागपूरात चाललं तरी काय? तरुणाने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात महिला जखमी

द्रव पदार्थ त्या महिलेच्या हातावर पडला आणि ती जखमी झाली. घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलींवरही त्या द्रवाचे काही शिंतोडे गेल्याने त्यांना ही त्रास झाला.

  • Share this:

प्रशांत मोहिती,  नागपूर 13 फेब्रुवारी : हिंगणघाटच्या घटनेवरून सर्व राज्यात संतप्त भावना असतानाच आता नागपूरजवळही धक्कादायक घटना घडलीय. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर एका पुरुषाने एसिड सदृश द्रव्य फेकले. संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी असून ती त्या परिसरात एड्स संबंधित सर्व्हे करायला गेली होती.

त्यावेळी अचानक सुमारे 25 वर्षीय तरुणाने समोर येऊन महिलेवर अ‍ॅसिडसारखा पदार्थ टाकला.

द्रव पदार्थ त्या महिलेच्या हातावर पडला आणि ती जखमी झाली. घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलींवरही त्या द्रवाचे काही शिंतोडे गेल्याने त्यांना ही त्रास झाला. त्या किरकोळ जखमी आहेत. त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

तर त्याच वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यावर त्या द्रवाचे शिंतोडे गेल्याने तिला गळ्यावर भाजले आहे. अ‍ॅसिडसारखा पदार्थ फेकणाऱ्या तरुणाचं नाव निलेश कान्हेरे आहे अशी माहितीही पुढे आलीय.

हेही वाचा...

VIDEO : नाश्ता करताना झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, 14 लोकांचा जीव धोक्यात

‘बघ मी आत्महत्या करतोय’, पतीने फेसबुक LIVE करत संपवलं जीवन

पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला? संशोधनात समोर आली धक्कादायक

First published: February 13, 2020, 3:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या