नागपूर पोलिसांचं 'लँडर विक्रम'ला कळकळीचं आवाहन, वाचून तुम्हीही नक्कीच दाद द्याल!

नागपूर पोलिसांच्या धाकामुळे का होईल 'लँडर विक्रम'ने प्रतिसाद द्यावं अशी प्रार्थनाही अनेकांनी केलीय.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 10:20 PM IST

नागपूर पोलिसांचं 'लँडर विक्रम'ला कळकळीचं आवाहन, वाचून तुम्हीही नक्कीच दाद द्याल!

नागपूर 9 सप्टेंबर : देशभर सध्या चर्चा आहे ती ISRO आणि 'लँडर विक्रम'ची. 7 सप्टेंबरला सर्व देशाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पण थोडक्यात 'लँडर विक्रम'ने हुलकावणी दिली. ISRO च्या प्रयत्नांना यश आलं आणि आज 'लँडर विक्रम' सुखरुप असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पुढेचे 12 दिवस विक्रमशी संपर्क साधण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. आता या गोष्टींचा आणि नागपूर पोलिसांचा काय संबंध असा प्रश्न तुम्ही नक्कीच विचाराल. पण कायम गुन्ह्यांसंबंधी ट्विट करणाऱ्या नागपूर पोलिसांच्या कल्पकतेला खरच दाद दिली पाहिजे. नागपूर पोलिसांनी यासंबंधी केलेलं एक ट्विट व्हायरल झालं असून सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

कंट्रोलरुममधून दिल्या जाणाऱ्या सिग्नल प्रतिसाद न देता शेवटच्या क्षणी 'लँडर विक्रम' भरकटला होता. त्यामुळे त्याचा कल्पकतेनं वापर करत नागपूर पोलिसांनी 'लँडर विक्रम'ला कळकळीचं आवाहन केलंय. त्यात म्हटलं आहे की, प्रिय विक्रम, तु तातडीने प्रतिसाद दे. तु सिग्नल तोडल्यामुळे आम्ही तुला कुठलाही दंड करणार नाही. कायम दहशत आणि धाक वाटणाऱ्या पोलिसांच्या या कृतीमुळे वाचणाऱ्या प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर हसू येईल अशी प्रतिक्रिया एकाने ट्विटरवर व्यक्त केलीय. 12 हजारांपेक्षा जास्त लोकांनी ते ट्विट Retweet केलंय तर 45 हजारांपेक्षा जास्त लोकांनी ते Like केलंय.

VIDEO : पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरी करत होते अतिरेकी

वाहतुकीच्या नियमांची आणि ते मोडले तर होणाऱ्या दंडाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. त्यामुळे नियम न मोडता गाडी चालवा नाहीतर जो दंड बसेल त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होईल असे नवे नियम आहेत. हे ट्विट करताना तोही संदर्भ इंथं जोडण्यात येतोय. पण काहीही असो. नागपूर पोलिसांच्या या ट्विटला दाद दिलीच पाहिजे. नागपूर पोलिसांच्या धाकामुळे का होईल 'लँडर विक्रम'ने प्रतिसाद द्यावं अशी प्रार्थनाही अनेकांनी केलीय.

Loading...

विक्रम सुरक्षीत, पुढचे 12 दिवस महत्त्वाचे

चांद्रयान 2 मोहिमेत फक्त 2 किमी अंतर राहिलं असताना लँडर विक्रमशी संपर्क तुटला होता. लँडर विक्रम सापडलं असल्याचं रविवारी इस्त्रोने स्पष्ट केलं होतं. आता इस्रोनं आणखी एक आनंदाची बातमी दिली असून विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी याबाबतची माहिती पीटीआयला दिली आहे.

चंद्रावर लँडर उतरवताना हार्ड लँडिंग झालं असण्याची शक्यता आहे. ऑर्बिटरनं पाठवलेल्या फोटोवरून लँडर पुर्णपणे सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. लँडरचे तुकडे होण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही झालेलं नसल्याचं इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विक्रमशी संपर्क साधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.

घुसखोरांना ज्यांना मांडीवर बसवायचं त्यांनी बसवावं, आम्ही हाकलणारच - उद्धव ठाकरे

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि लँडर विक्रम चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला होता. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असं यश या मोहिमेला मिळालं नसलं तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही. इस्त्रोच्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही. संपर्क तुटला असला तरी चांद्रयान मोहिम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान 2 चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे. पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 2 चे ऑर्बिटर त्याचं काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो इस्त्रोला मिळत राहतील.

खरं की खोटं? व्हायरल झालेला हा फोटो विक्रम लँडरचा आहे का?

शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की, लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.

ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त 14 दिवस काम करू शकतो. तर ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून इस्त्रोला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहिती सुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरनं लँडर विक्रमचे फोटो पाठवल्यानंतर त्याचे विश्लेषण केल्यानंतर नेमके कारण समजू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...