कशी करायची सांबारवडी? नितीन गडकरींनी सांगितली रेसिपी

नागपूरमध्ये 'ऑरेंज सिटी फूड प्लाझा'चं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्या वेळचा हा भन्नाट किस्सा..

  • Share this:

नागपूर, 10 जानेवारी: नागपूरकरांसाठी खूशखबर आहे. कारण नागपूरमध्ये 'ऑरेंज सिटी फूड प्लाझा'चं लोकार्पण झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. त्यामुळे नागपूरकरांची नवी खाऊगल्ली ही असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अस्सल खवय्ये अशी ओळख आहे. त्यामुळे नागपूरमध्ये खवय्यांसाठी त्यांच्या संकल्पनेतून मोठा प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. तिथल्या स्टॉलवर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना केंद्रीय मंत्र्यांनी चक्क विदर्भाची खासीयत असणाऱ्या सांबारवडीची पाककृतीच सांगितली.

गडकरी आहेत चांगले कुक

ऑरेंज सिटी फूड प्लाझाचं लोकार्पण झाल्यानंतर गडकरींनी सर्व स्टॉलला भेट दिली. एका स्टॉलवरील सांभार वडी पाहून त्यांना राहावलं नाही. त्यांनी सांबारवडी खाण्यासाठी घेतली. त्यानतंर त्यांना पुण्यातील सांबारवडीची आठवण झाली. विदर्भात कोथिंबिरीला सांभार म्हणतात आणि कोथिंबिरीची वेगळ्या पद्धतीची वडी - सांभारवडी म्हणून प्रसिद्ध आहे. गडकरी यांनी स्टॉल धारकाला सांभारवडी कशी करायची याची रेसिपीच सांगितली. आता केंद्रीय मंत्री खुद्द सांबारवडी तयार करण्याची रेसिपी सांगत असल्याचं पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. गडकरी अस्सल खवय्ये तर आहेच ते एक उत्तम कूक असल्याची प्रचिती नागपूरकरांना आली.

सर्व स्टॉलची जाणून घेतली  माहिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उत्तम खवय्ये आहे. याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळं त्यांच्या संकल्पनेतून नागपुरातील गांधीनगर तलावालगत खाऊ गल्लीची निर्मिती करण्यात आली. लोकार्पणानंतर  एकेका स्टॉलची माहिती गडकरींना जाणून घेतली. स्टॉलधारक कोणते पदार्थ कसे करतात याची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसंच खास रेसिपीला त्यांनी दादही दिली आहे. काही रेसिपीचं तंत्र त्यांनी मन लावून जाणून घेतलं.

लोकार्पण सोहळ्याला मोठी गर्दी

नितीन गडकरींनी लोकार्पण केलेल्या ऑरेंज सिटी फूड प्लाझाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. लोकार्पण कार्यक्रमासाठी तर गर्दी होतीच. मात्र नवी खाऊ गल्ली पाहाण्यासाठी लोकांनी पहिल्याचं दिवशी गर्दी केली होती. यावेळी नागपूर महापालिकेचं महापौर संदीप जोशी, आमदार आणि इतर दिग्गज नेते उपस्थित होते.

अन्य बातम्या

आता 5 दिवसांत सुरू करू शकता कोणताही बिझनेस, मोदी सरकार करणार हे बदल

आईने तान्हुलीला रस्त्यावर टाकलं, मात्र वर्दीतल्या मातेनं ह्रदयाशी कवटाळलं

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच उद्धव आणि राज ठाकरेंचं मुंबईत शक्तिप्रदर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 07:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading