Home /News /maharashtra /

अंत्यसंस्कार करताना मृतदेहाचा चेहरा उघडताच कुटुंबियांना बसला धक्का, पालिकेचा भोंगळा कारभार उघड

अंत्यसंस्कार करताना मृतदेहाचा चेहरा उघडताच कुटुंबियांना बसला धक्का, पालिकेचा भोंगळा कारभार उघड

अंत्यसंस्कारातही 20हून अधिक लोक भाग घेऊ शकत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे नियम कडक केले आहे.

अंत्यसंस्कारातही 20हून अधिक लोक भाग घेऊ शकत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे नियम कडक केले आहे.

नागपुरात मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांची अवहेलना करण्यात आली आहे. उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या पुरुष मृतदेहाच्या जागी महिलेचा मृतदेह दिल्याचं समोर आलं आहे.

    नागपूर, 07 सप्टेंबर : कोरोनाच्या धोक्यामुळे आधीच नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशात पालिकेच्या ढिसाळ कारभारमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. नागपूरमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांची अवहेलना करण्यात आली आहे. उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या पुरुष मृतदेहाच्या जागी महिलेचा मृतदेह दिल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाबाई घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे कुटुंबियांच्या भावना दुखावल्या आहेत. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात असा भोंगळा कारभार समोर आला आहे. स्मशानभूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असताना घटना लक्षात आली आणि मोठा अनर्थ टळला. जुन्नरमध्ये व्हायरल होतोय हा मनमोहक VIDEO, या रंगाच्या तुम्हीही पडाल प्रेमात लता मंगेशकर रुग्णालयात एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी चेहरा उघडण्यात आला आणि कुटुंबियांसह उपस्थितांच्या पायाखालची जमीन सरकली. पुरुषाच्या मृतदेहाऐवजी महिलेचा मृतदेह असल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्णांसाठी Good News, 8 दिवसांत रशियाची लस लोकांसाठी उपलब्ध होणार पालिकेने महिलेच्या मृतदेहावर पुरुषाच्या नावाचा टॅग लावला होता. यामुळे कुटुंबियांचा मनस्ताप झाला आहे. खरंतर, नागपुरात कोरोना परिस्थिती गंभीर असल्यामुळे अशा घटनामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे अशा प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या