Home /News /maharashtra /

नागपूरच्या महापौरांनी पडल्या नितीन गडकरींच्या पाया, भाजपमधील नाराजी नाट्यावर पडदा

नागपूरच्या महापौरांनी पडल्या नितीन गडकरींच्या पाया, भाजपमधील नाराजी नाट्यावर पडदा

नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अनिल सोले यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण, अनिल सोले यांचा पत्ता कट करण्यात आला.

नागपूर, 12 नोव्हेंबर : विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी (graduate and teacher legislative council elections) सर्वच पक्षाचे उमेदवार आता रिंगणात उतरले आहे. भाजपला मात्र, बंडखोरीचा फटका बसला आहे. नागपूरमध्येही भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) उमेदवार संदीप जोशी (sandeep Joshi) यांनी सर्वात आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांची भेट घेऊनच अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी नागपूरमधून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अनिल सोले यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण, अनिल सोले यांचा पत्ता कट करण्यात आला. पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी यांना संधी मिळाली. अनिल सोले यांना उमेदवारी न दिल्यामुळे नितीन गडकरी गट नाराज असल्याची चर्चा रंगली होती. धोनीचा रिटायरमेंट प्लॅन आला समोर, 7 एकरच्या फॉर्म हाउसमध्ये करणार 'हे' काम पण, आज अर्ज भरण्याआधी संदीप जोशी यांनी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जोशी यांनी गडकरींच्या पाया पडून आशिर्वाद घेतला.  नितीन गडकरींचा आशिर्वाद घेऊन जोशी यांनी भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही, असं सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. तर दुसरीकडे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं. माजी बीड भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक मानले जातात. Diwali 2020 : धनत्रयोदशीचं महत्त्व आणि मुहूर्त...कशी करायची पूजा जाणून घ्या उमेदवारी अर्ज भरताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती आणली होती. दुसरे बंडखोर उमेदवार प्रवीण घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर केली असली तरी दोन जणांनी अर्ज भरल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून आज दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पुण्यातून अरुण लाड यांना संधी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि पुण्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. पुढील महिन्यात 1 डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या