नागपूर 24 मे : राज्यात विदर्भ सगळ्यात जास्त उष्ण असतो. आणि त्यात उपराजधानी नागपूर सगळ्यात जास्त. नागपूरने आज रेकॉर्ड केला. राज्यात सगळ्यात जास्त तापमान नागपुरात नोंदवण्यात आलं. तब्बल 46.7 डिग्री एवढ्या तापमानाची आज नोंद करण्यात आली. तर शनिवारी 46.5 डिग्री एवढं तापमान होतं. नागपूरमध्ये आज महाराष्ट्रात सर्वात अधिक गरम दिवस राहिला असून येणाऱ्या दिवसात आणखी वाढण्याची शकता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.
नागपुरात तीन दिवसांपासून चांगलाच उष्मा वाढला आहे. आज नागपूरचे तापमान 46.7 अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे.
गेल्या तीन दिवसापासून नागपूर शहराच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम शहराच्या जनजीवनावर पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्ते थोडेफार सुरू राहत असले, तरी गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे दुपारी रस्ते सुनसान होत आहेत. नागरिक आपली महत्त्वाची कामे सकाळच्या प्रहरात उरकत आहेत किंवा सायंकाळी चारनंतर घराबाहेर पडण्याला प्राध्यान्य देत आहेत. पुढील आठवड्यातदेखील वातावरण चांगले तापणार असल्याचा इशारा हवामान खात्याचे उपमहासंचालक एम.एल.साहू यांनी दिला आहे. वर्तविला आहे.
असं आहे राज्यातलं कोरोना अपडेट
राज्यात आजही कोरोनाबाधितD रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. राज्यात आज 3041 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50 231 एवढी झालीय. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत 14 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
सकारात्मक बातमी : ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार
मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 542वर गेली आहे. त्यामुळे सरकारला चिंता असून ही वाढ रोखण्यावर सरकारने सगळं लक्ष केंद्रीत केलं आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 127 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 2018 झाली आहे.
हेही वाचा - या तीन कारणांमुळे कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका; अभ्यासातून खुलासाकोरोनाव्हायरसपासून खरंच संरक्षण देतं का Arsenicum Album 30 होमिओपॅथी औषध?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.