कुख्यात गुंडाचे घृणास्पद कारनामे उघड, महिलांचे लैंगिक शोषण करत वसूल केलं व्याज

कुख्यात गुंडाचे घृणास्पद कारनामे उघड, महिलांचे लैंगिक शोषण करत वसूल केलं व्याज

व्याज न देऊ शकणाऱ्या पीडित कुटुंबातील तरुणी आणि महिलांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड...

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,1 नोव्हेंबर: नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्याचे अनेक घृणास्पद कारनामे उघड झाले आहेत. या स्वयंघोषित डॉनने आपल्या दहशतीच्या जोरावर अनेक अवैध सावकारी सुरू केली होती. व्याज न देऊ शकणाऱ्या पीडित कुटुंबातील महिला, तरुणींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

इतवारी टांगा स्टॅण्डजवळ चहाची टपरी चालणाऱ्या संतोष आंबेकरने गेल्या 25 वर्षांत नागपुरातील गुन्हेगारी जगतावर राज्य केले. दहशतीतीच्या जोरावर खंडणी आणि धमकावून अनेकांना आयुष्यातून उठवले. गुंड संतोष आंबेकरची दहशत कमी व्हावी म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संतोषविरुद्ध तक्रार करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. गुंड संतोष आंबकेरचे तपासात अनेक घृणास्पद कृत्य समोर येत आहेत. आपल्या दहशतीच्या जोरावर आणि त्यातून कमावलेल्या काळ्या पैशातून अवैध सावकारीच्या दुष्टचक्रात त्याने अनेकांना अडकवले. संतोष आंबेकर गरजुंना आपल्या जाळ्यात ओढून पैशांची मदत करायचा आणि नंतर त्यांच्याकडून महिन्याकाठी तो 15 टक्के व्याज वसूल करत होता. व्याज न देऊ शकणाऱ्यांना धमकावून त्यांच्या संपत्ती बळकावण्याचे काम त्याची टोळी करायची. मात्र, पोलिस तपासात या अवैध सावकारीचा अत्यंत घृणास्पद प्रकारही पोलिस तपासात समोर आला आहे.

तरुणी-महिलांचे लैंगिक शोषण

व्याज न देऊ शकणाऱ्या पीडित कुटुंबातील तरुणी आणि महिलांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे अनेक महिलांनी सांगितल्याचे पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) गजानन राजमाने यांनी माहिती दिली.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 02:17 PM IST

ताज्या बातम्या