प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)
नागपूर, 19 नोव्हेंबर: इमामवाडा परिसरातील राजाबाक्षा रोडवर एका कारमध्ये स्वार असलेल्या युवकाला रोखून अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. ही घटना काल, (सोमवारी) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली. विजय रमेश खंडाईत (वय-30, रा. शताब्दी चौक) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विजय आणि त्याचा मित्र यशवंत चव्हाण दोघेही कारनेराजाबाक्षा वस्तीतून जात होते. या रोडवर हनुमान मंदिराजवळ दोघांना काही युवकांनी रोखले. त्यांच्यात वाद झाला. यानंतर आरोपींनी विजयवर शस्त्रांनी हल्ला करत त्याला जखमी केले. त्याचा मित्र यशवंतने मध्यस्थी केली असता त्याच्यावरही हल्ला केला. यशवंत पळ काढला. त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. आरोपींनी विजयला घटनास्थळीच संपवले. माहिती मिळताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. विजयला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
महिलांचे लैंगिक शोषण करत या कुख्यात गुंडाने वसूल केलं व्याज
नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्याचे अनेक घृणास्पद कारनामे उघड झाले आहेत. या स्वयंघोषित डॉनने आपल्या दहशतीच्या जोरावर अनेक अवैध सावकारी सुरू केली होती. व्याज न देऊ शकणाऱ्या पीडित कुटुंबातील महिला, तरुणींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
इतवारी टांगा स्टॅण्डजवळ चहाची टपरी चालणाऱ्या संतोष आंबेकरने गेल्या 25 वर्षांत नागपुरातील गुन्हेगारी जगतावर राज्य केले. दहशतीतीच्या जोरावर खंडणी आणि धमकावून अनेकांना आयुष्यातून उठवले. गुंड संतोष आंबेकरची दहशत कमी व्हावी म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संतोषविरुद्ध तक्रार करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. गुंड संतोष आंबकेरचे तपासात अनेक घृणास्पद कृत्य समोर येत आहेत. आपल्या दहशतीच्या जोरावर आणि त्यातून कमावलेल्या काळ्या पैशातून अवैध सावकारीच्या दुष्टचक्रात त्याने अनेकांना अडकवले. संतोष आंबेकर गरजुंना आपल्या जाळ्यात ओढून पैशांची मदत करायचा आणि नंतर त्यांच्याकडून महिन्याकाठी तो 15 टक्के व्याज वसूल करत होता. व्याज न देऊ शकणाऱ्यांना धमकावून त्यांच्या संपत्ती बळकावण्याचे काम त्याची टोळी करायची. मात्र, पोलिस तपासात या अवैध सावकारीचा अत्यंत घृणास्पद प्रकारही पोलिस तपासात समोर आला आहे.
तरुणी-महिलांचे लैंगिक शोषण
व्याज न देऊ शकणाऱ्या पीडित कुटुंबातील तरुणी आणि महिलांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे अनेक महिलांनी सांगितल्याचे पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) गजानन राजमाने यांनी माहिती दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा