Home /News /maharashtra /

नागपूर: कोविड सेंटरमधून कुख्यात गुंड पळाला, पोलिसांना असं ठेवलं गाफील!

नागपूर: कोविड सेंटरमधून कुख्यात गुंड पळाला, पोलिसांना असं ठेवलं गाफील!

मात्र पोलिसांना गाफील ठेवण्यासाठी त्याने योजना आखली. रविवारी मध्यरात्री तो टॉयलेटला चार वेळा गेला. त्यावेळी त्याने पळण्याचा मार्ग निवडून ठेवला होता.

नागपूर 9 नोव्हेंबर: नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या कोविड सेंटरमधून एका कुख्यात गुंड कैदी सोमवारी पळून गेला. पोलिसांना काफील ठेवण्यासाठी त्याने खास योजना बनवली होती. टॉयलेट पाईपच्या मदतीने तो खाली उतरला आणि पळून गेला. पोलिसांनी उशीराने याची माहिती कळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नरेश मैलांगे असं त्याचं नाव असून अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे. नरेश हा मध्यवर्ती कारागृहात बंद होता. पोलिसांच्या डीबी पथकाने त्याला वॉरंटवर ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याला कोविड झाल्याचं कळालं. त्यानंतर त्याला मेडिकलच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसही तैनात करण्यात आले होते. मात्र पोलिसांना गाफील ठेवण्यासाठी त्याने योजना आखली. रविवारी मध्यरात्री तो टॉयलेटला चार वेळा गेला. त्यावेळी त्याने पळण्याचा मार्ग निवडून ठेवला होता. कसं खाली उतरायचं हे त्याने निश्चित करून ठेवलं होतं. पोलिसांना वाटलं त्याला काहीतरी त्रास होत आहे. पहाटे पहाटे तो पाचव्यांदा टॉयलेटला गेला आणि खिडकीमधून पाईपच्या साह्याने खाली उतरत पळून गेला. ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 17 लाख 23 हजारांवर, बाजारपेठांमधल्या गर्दीने चिंता नरेश लवकर आला नाही त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर तो पळाला असल्याचं स्पष्ट झालं. आता त्याला अटक करण्यासठी पोलिसांनी खास पथकं स्थापन केली आहेत. त्याला कोविड असल्याने पोलिसांची चिंता वाढली  आहे. त्याचबरोबर कोरोनाचा प्रसार होण्याचीही भीती निर्माण झालीय.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या