Home /News /maharashtra /

हेडफोन लावून रेल्वे ट्रॅकवर चालत होता तरुण; मागून गाडी आली, हॉर्नही वाजवला, पण...

हेडफोन लावून रेल्वे ट्रॅकवर चालत होता तरुण; मागून गाडी आली, हॉर्नही वाजवला, पण...

22 वर्षीय तरुण रेल्वे ट्रॅकवर कानात हेडफोन लावून गाणी ऐकत जात असतानाच ही घटना घडली.

नागपूर, 5 डिसेंबर : मोबाईल हे आताच्या तरुणाईसाठी एक प्रकारचं व्यसन झालं आहे. त्यातही सार्वजनिक ठिकाणीही हेडफोन्सचा वापर करत गाणी ऐकण्याची काहींना सवय असते. मात्र हीच सवय एका 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. मोबाईलच्या हेडफोन्समुळे रेल्वेच्या अपघातात यश गडवाल या तरुणाने गमावला जीव आहे. छिंदवाड्याहून नागपूरला जाणाऱ्या रेल्वे इंजिन खाली पडून चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सायंकाळच्या दरम्यान सावनेर येथे घडली. 22 वर्षीय तरुण रेल्वे ट्रॅकवर कानात हेडफोन लावून गाणी ऐकत जात असतानाच ही घटना घडली. समोर तरुण चालत असल्याचं दिसल्यानंतर इंजिन चालकाने हॉर्न वाजविला. मात्र कानात हेडफोन असल्याने त्या तरुणापर्यंत हॉर्नचा आवाज पोहोचू शकला नाही. परिणामी यश गडवाल हा रेल्वेखाली आला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान, घरातून बाहेर पडल्यानंतरही हेडफोनचा वापर करत गाणी ऐकण्याचा अनेकांना छंद असतो. वाहन चालवताना हेडफोनचा वापर केल्यानेही अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे याबाबत तरुणांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Nagpur, Vidarbha

पुढील बातम्या