VIDEO...नाही तर बँक फोडून टाकेल, खासदार नवनीत राणा बँक अधिकाऱ्यांवर भडकल्या

VIDEO...नाही तर बँक फोडून टाकेल, खासदार नवनीत राणा बँक अधिकाऱ्यांवर भडकल्या

आमच्याकडे बँकेत जास्त कर्मचारी नाहीत त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितल्यावर खासदार राणा यांचा पारा आणखीनच भडकल्या.

  • Share this:

संजय शेंडे, अमरावती 28 जानेवारी : बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. या तक्रारींबाबत माहीती घेण्याकरीता जेव्हा खासदार नवनीत राणा स्वत: मेळघाटमधील चुर्णी गावातील अलाहाबाद बँकेत पोहचल्या तेव्हा त्यांना तेथील लोकांनी बँकेकडून होत असलेल्या त्रासाची त्यांना माहीती दिली.

बँकेतून 1000 रूपये काढायचे असल्यास चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात अशी माहीती उपस्थित नागरिकांनी त्यांना दिली. याबाबत नवनीत राणांनी बँक कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. त्यामुळे खासदार नवनीत राणांचा राग अनावर झाला.

जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात गवळी सुप्रीम कोर्टात, शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण

तसेच पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते तोपर्यंत योग्य उत्तर मिळाले नाही तर बँक फोडून टाकेल असा दमही दिला. आणि शेवटी 5 वाजता बँकेने लेखी आश्वासन दिल्या नंतर खासदार तिथून निघाल्या. या आधीही नवनीत राणा यांनी मेळघाटातल्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं  होतं. आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटमध्ये आधीच सुविधांची कमतरता आहे. त्यात अधिकारी अडवणूक करतात.

महाविकास आघाडीतल्या वाचाळवीरांनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी

50-60 किलोमीटरवरून लोक बँकेत कामासाठी येत असतात. मात्र त्यांना पुन्हा येण्यास सांगितलं जातं. आमच्याकडे बँकेत जास्त कर्मचारी नाहीत त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितल्यावर खासदार राणा यांचा पारा आणखीनच भडकल्या.

असं असेल तर बँक बंद करा. लोकांकडून तुम्ही पैसे घेता आणि त्यांचीच कामं होत नसतील तर काय करायचं असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला.

First published: January 28, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading