पुण्यात शिकणाऱ्या मुला-मुलीला पैसे पुरवू न शकल्याने आईने केली आत्महत्या

पुण्यात शिकणाऱ्या मुला-मुलीला पैसे पुरवू न शकल्याने आईने केली आत्महत्या

मुला-मुलीच्या शिक्षणाला पैसे पुरवू न शकल्याने जन्मदात्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलिमा मोहन कडू (वय-45) असे मृत महिलेचे नाव आहे.

  • Share this:

अमरावती, 18 ऑगस्ट- शहरातील रविनगरात एक हृदयदायक घटना घडली आहे. मुला-मुलीच्या शिक्षणाला पैसे पुरवू न शकल्याने जन्मदात्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलिमा मोहन कडू (वय-45) असे मृत महिलेचे नाव आहे. नीलिमा यांचा मुलगा आणि मुलगी पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणासाठी पैसे देता न आल्याने नीलिमा यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलिमा यांचे पती मोहन कडू हे जयस्तंभ चौकातील एका पेट्रोलपंपावर नोकरी करतात. मिळणाऱ्या पगारावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. कडू दाम्पत्याने हलाखीच्या परिस्थितीतही मुलगा आणि मुलीला इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठविले आहे. काही दिवसांपासून मुलगा-मुलगी शिक्षणासाठी पैसे मागत होते. मात्र, आर्थिक विवंचनेमुळे ते पैसै पाठवू शकले नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची खंत कडू दाम्पत्याला होती. कडू दाम्पत्य मागील काही दिवसांपासून तणावात होते. शुक्रवारी (16 ऑगस्ट) पती ड्युटीवर गेल्यानंतर नीलिमा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नीलिमा कडू यांची दोन्ही मुले पुण्यावरून शनिवारी परतल्यानंतर नीलिमा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माय लेकरांच्या सुटकेचा थरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading