पोटच्या दोन मुलांना गळफास देऊन जन्मदात्या आईने केली आत्महत्या

पोटच्या दोन मुलांना गळफास देऊन जन्मदात्या आईने केली आत्महत्या

पोटच्या दोन मुलांना गळफास देऊन जन्महदात्या आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

वर्धा, 31 ऑगस्ट- पोटच्या दोन मुलांना गळफास देऊन जन्महदात्या आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील एका कंपनीच्या परिसरात शुक्रवारी (30 ऑगस्ट) ही घटना घडली. सविता आशिष साहू (वय-31), आयुष आशिष साहू (8) आणि ओरा आशिष साहू (30) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम गल्वा येथील कंपनीमध्ये आशिष साहू हे नोकरीला आहेत. त्यांना कंपनीच्या आवारात असलेल्या वसाहतीमध्ये राहण्यासाठी निवासस्थान देण्यात आले आहे. आशिष हे कंपनीत गेल्यानंतर सविता यांनी आधी मुलांना गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवले. सविताने आपल्या मुलांना गळफास देऊन स्वत: आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

कुटुंबातील चौघांनी मृत्युला कवटाळले

दरम्यान, मागील आठवड्यात अशीच घटना घडली होती. पारनेर तालुक्यातील गुणोरे-म्हसे खुर्द येथे कुटुंबातील चौघांनी मृत्युला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसह दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. म्हसे खुर्द या गावाजवळ असणाऱ्या बडे-ढवळे वस्तीत राहणारे बडे कुटुंबातील दाम्पत्य आणि त्यांची दोन मुले अशा चौघे घरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थतेत आढळून आले. बाबाजी विठ्ठल बडे (40), कविता बाबाजी बडे (35), आदित्य बाबाजी बडे (15) आणि धनंजय बाबाजी बडे (13 )अशी मृतांची नावे आहे. सकाळी लवकर उठणारे बढे कुटुंब शेजारी राहणाऱ्या लोकांना न दिसल्याने त्यांनी घरात डोकावले असता नवरा-बायको आणि दोन्ही मुले हे घरातील एका पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर पारनेर पोलिसांना या ठिकाणी तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

भरधाव ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या