नागपूरचा मोस्ट वॉन्टेड गुंड संतोष आंबेकरला पोलिसांचा दणका, काढली 'धिंड'

नागपूरचा मोस्ट वॉन्टेड गुंड संतोष आंबेकरला पोलिसांचा दणका, काढली 'धिंड'

नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी दहशत आहे. खंडणी, दरोडा, खून, दंगल भडकवणं अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती.

  • Share this:

नागपूर 13 ऑक्टोंबर : पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यात अनेकदा यशस्वी होणारा गँगस्टर संतोष आंबेकरला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. नागपूर पोलिसांच्या क्राइम ब्रांचने संतोषला एका खंडणीच्या प्रकरणात ही अटक केली. संतोष यापूर्वी काही प्रकरणांमध्ये कोर्टातून पुराव्याअभावी सुटला होता. त्यामुळे या नव्या  खंडणीप्रकरणात तो जाळ्यात येणार हे कळताच पोलिसांनी चातुर्याने त्याला अटक करत कोर्टातही हजर केलंय. आंबेकरची नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी दहशत आहे. खंडणी, दरोडा, खून, दंगल भडकवणं अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. गुजरातच्या एका उद्योजकाला जमीन खरेदीच्या प्रकरणात त्याने एक कोटींची खंडणी मागितली होती. त्या उद्योजकाने या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार केली होती.

आदित्य ठाकरेंसोबत काम करण्यास तयार, नितेश राणेंनी पुढे केला मैत्रीचा हात

नागपूर पोलिसांच्या क्राइम ब्रांचने चौकशी करून त्याच्या विरोधात पुरावे जमा केले. मात्र त्याला कारवाईची हवा लागू दिली नाही. नंतर त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावणं धाडलं आणि चौकशीनंतर त्याला अटक केली.संतोष आंबेकरला नेसत्या कपड्यांनीशी त्याच्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी आणलं होतं. त्याला चप्पल घालण्याची संधीही पोलिसांनी त्याला मिळू दिली नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमधून त्याला  बेड्या घालूनच अनवानी चालत कोर्टात हजर केलं. पोलिसांनी ही एक प्रकारची धिंडच काढली असं बोललं जातंय. संतोष आंबेकरची दहशत मोडण्यासाठी पोलिसांनी त्याला बेड्या घालून कोर्टात हजर केलं असल्याचंही सांगितलंय जातंय.

चंद्रावर जाऊन तरुणांचं पोट भरणार का? राहुल गांधींचा मोदींना सवाल!

2014 मध्ये संतोष आंबेकरनं चक्क अंबाझरी पोलीस ठाण्यातच बिल्डरवर रिव्हॉल्वर रोखून 65 लाखांचे चेक लिहून घेतल्याने खळबळ उडाली होती. राहुल वासनिक या व्यक्तीची प्रॉपर्टी बिल्डर जितेंद्र चव्हाण यांनी विकत घेतली होती. सर्व पैसे देवूनही राहुलची पत्नी पुनम वासनिक ही या प्रॉपर्टीचा ताबा सोडत नव्हती. पुनमनं हे प्रकरण गुंड संतोष आंबेकरच्या कानावर घातलं.  त्यानंतर जितेंद्र चव्हाण या बिल्डरला संतोष आंबेकरने अंबाझरी पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर रिव्हॉल्वरने धमकावले आणि मारहाणही केली होती.

शरद पवार राजकारणातले 'नटरंग', त्यामुळेच ते 'हातवारे' करताहेत - मुख्यमंत्री

संतोष आंबेकरला मोक्का न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षाही ठोठावली होती. पण तो तीन वेळा 'मोक्का'मधून निर्दोष बाहेर आला. खंडणी मागणे आणि प्रॉपर्टीसाठी लोकांना धमकावणे ह्यासाठी आंबेकर शहरात चर्चेत असतो.

कोण आहे गुंड संतोष आंबेकर ?

- संतोष आंबेकर तीन वेळा मोक्कामध्ये निर्दोष सुटला

- व्यापार्‍यांकडून खंडणी मागण्यात अग्रेसर

- वादातील मालमत्ता घेणं, धमकावून मालमत्ता रिकाम्या करण्यासाठी कुप्रसिद्ध

- इतवारी परिसरातल्या प्रशस्त बंगल्यात लोकांना बोलावून धमकावणं

- नागपूरमधल्या अनेक राजकीय पक्षातल्या नेत्यांशी संबंधांची चर्चा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 06:26 PM IST

ताज्या बातम्या