वाशिम 28 ऑक्टोबर: IPL सामन्यांवरचे सट्टे (IPL betting) हे फक्त काही मुंबई, पुण्यात आणि फक्त मेट्रो शहरांमध्येच लावले जात नाहीत. त्याचं लोण आता थेट छोट्या शहरांपर्यंत गेलं आहे. विदर्भातल्या वाशिम जवळच्या मालेगावमधली एक धक्कादायक घटना समोर आल्याने सगळेच हादरून गेले आहेत. सट्ट्यात पैसे हारल्याने एका तरुणाने आपल्या आईचेच दागिने चोरून ते गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उघड झाल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव शहरातील अर्चना मिश्रा यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह 10 हजार रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचं आढळून आलं होतं. घरात चोरी झाली आणि पैसे आणि दागिने गेले असं त्यांना वाटतं.
त्यानंतर अर्चना मिश्रा यांनी पोलिसांमध्ये घरफोडी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता त्यांना अर्चना मिश्रांचा मोठा मुलगा तेजस (22 ) याच्यावर संशय आला. पोलिसांच्या चौकशीत तेजस हा आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावत असल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांनी आणखी चौकशी केली.
'सूर्यकुमारला वगळण्याचा हेतूची चौकशी व्हावी', वेंगसरकरांनी गांगुलीकडे केली मागणी
तेव्हा सट्ट्यावर लावलेले पैसे हरल्याची माहिती दिली. त्यानंतर तेजसनेच पैसे चोरल्याची कबुली दिली. त्याने काही सोनं गहान ठेवलं तर काही सोनं विकलं. तर काही पैसेही रोख दिलेत. पोलिसांनी काही सोनं आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी तेजससह आणखी एकाला अटक केल्याची माहिती मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी दिली.
COVID-19: राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही घसरली, मृत्यूचं प्रमाण कमी
सध्या शाळा कॉलेजबंद आहे. ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. त्यामुळे मुलांना अभ्यासाचा ताण नाही. त्याच्या सोबतीला स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्याने मुले ऑनलाईन अनेक गोष्टी करत आहेत. त्यांच्यावर पालकांचं लक्ष नसल्याने मुले डिजिटल गॅझेटच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.