महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, भाजप आमदारासह शहराध्यक्षावर गुन्हा

महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, भाजप आमदारासह शहराध्यक्षावर गुन्हा

नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अशा परिस्थितीत घरी कशी जाणार असे विचारले. त्यावर तेथे उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला असभ्य भाषेचा उपयोग केला.

  • Share this:

नागपूर, 19 सप्टेंबर: महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी तुमसरचे भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, या प्रकरणी खुद्द आमदार चरण वाघमारे यांनी देखील पोलिसांना एक निवेदन देऊन या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण..?

तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम 16 सप्टेंबरला रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यावेळी नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अशा परिस्थितीत घरी कशी जाणार असे विचारले. त्यावर तेथे उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला असभ्य भाषेचा उपयोग केला. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने असे न बोलण्याची विनंती केली. मात्र, जिभकाटे यांनी त्यांच्याशी भांडण सुरू करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आमदार चरण वाघमारे देखील तेथे आले. त्यांनीही महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

हात पकडून धक्का दिला..

पीडित महिला अधिकारीने बुधवारी (18 सप्टेंबर) सायंकाळी आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचा हात पकडून धक्काही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आमदार आणि शहराध्यक्षाविरुद्ध कलम 353, 354, 472, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमदार आणि शहराध्यक्षाला अद्यापही अटक झालेली नाही.

Loading...

VIDEO:आईची औषधं घेण्यासाठी लेक पुराच्या पाण्यात उतरला, बघ्यांनी मात्र व्हिडीओ काढला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2019 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...