स्वच्छतागृहात काढलेला व्हिडीओ व्हायरल, तणावातून मुलीची आत्महत्या

स्वच्छतागृहात काढलेला व्हिडीओ व्हायरल, तणावातून मुलीची आत्महत्या

तिचा गृहपाठ राहिल्याने तिने शाळेतल्या मित्राला माहिती विचारण्यासाठी बोलावलं होतं. ते दोघं शाळेतल्या स्वच्छतागृहाजवळ बोलत होते. त्यानंतर जे घडलं जे घडलं ते तिच्या जीवावर बेतलं.

  • Share this:

किशोर गोमासे, वाशीम 06 डिसेंबर : हैदराबाद आणि उन्नाव इथली घटना ताजी असतानाच विदर्भातल्या वाशीम मध्ये एक खळबळजनक घटना समोर आलीय. एका मुलीचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे धक्का बसल्याने त्या मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजन घटना वाशीममध्ये घडलीय.  देशभर मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने संतापाची लाट उसळलीय. अशा घटनांमध्ये तातडीने तपास करून त्याची चौकशी करावी अशी मागणी होतेय. समाजात सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच अशा घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या पालकांनी केलीय.

स्वतंत्र देशाची घोषणा करणाऱ्या ढोंगी 'बाबा'ला दणका, सरकारने घेतला मोठा निर्णय

वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या वॉशरूम मध्ये एकाने विद्यार्थिनीची मोबाईल क्लिप काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने बदनामीच्या भीतीने मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबियाच्या तक्रारी नंतर मंगरुळपीर पोलीस ठाण्यात 2 युवकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मंगरुळपिर येथील जिल्हा परिषद हायस्कुलमधील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला नोट्स च्या मागणी करिता एका मुलाने वॉशरूम मध्ये बोलावले असता दुसऱ्या युवकाने दोघांचा बोलतानाचा व्हिडिओ  काढून इतर लोकांच्या मोबाईलवर पाठवला. समाजात बदनामी होईल या भीतीने मुलीने पिंप्री गावी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

घटनेची फिर्याद मृतक मुलीच्या वडिलांनी मंगरुळपिर पोलीस ठाण्यात नोंदविताच पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून दोघांनाही अटक केली असून सायबर सेल मार्फत चौकशी करून किती लोकांना व्हिडीओ शेअर केला या बाबत उघड झाल्या नंतर आणखी आरोपी वाढणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

काँग्रेसचे खासदार संसदेत अंगावर धावून आले स्मृती इराणींचा गंभीर आरोप

काय झालं हैदराबादमध्ये?

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळी तपास करण्यासाठी गेले असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. यामध्ये चारही आरोपी ठार झाले आहे. दरम्यान, आम्ही आरोपींना शरण जाण्यासाठी सांगितले तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी सांगितलं.

हैदराबाद Encounter : आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीचं का नेलं घटनास्थळी?

हैदराबादमधील या एन्काऊंटरवर प्रकरणावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 'पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटवर केल्याने पीडितेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला,' अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. मात्र त्याचवेळी 'कोणतीही शिक्षा ही कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवी, त्यासाठी आग्रह धरायला हवा,' असाही मतप्रवाह समोर येत आहे. या सर्व एन्काऊंटर प्रकरणात सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार चर्चेत आले आहेत. मात्र सज्जनार यांनी केलेला हा पहिलाच एन्काऊंटर नाही. याआधी 2008 मध्येही सज्जनार यांच्या टीमने आरोपींचा एन्काऊंटर केला होता

Published by: Ajay Kautikwar
First published: December 6, 2019, 7:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading