तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून केली लगट, युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा 'प्रताप'

तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून केली लगट, युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा 'प्रताप'

संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे...

  • Share this:

भास्कर मेहरे,(प्रतिनिधी)

यवतमाळ,25 डिसेंबर: अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांने हा प्रताप केल्याची माहिती मिळाली आहे. सुमित खांदवे असे आरोपीचे नाव आहे. नागरिकांनी आरोपीला चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पीडित तरुणी विद्यार्थिनी आहे. आरोपीने तिला जबरदस्तीने गाडीत बसवून तिचा विनयभंग केला. ही घटना यवतमाळ शहरात घडली. या घटनेमुळे विद्यार्थिनीसह त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर आरोपी तरुण हा युवासेनेचा कार्यकर्ता आहे. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आरोपी सुमित खांदवे असे आरोपीचे नाव आहे. अमरावती मार्गाने येत असताना त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी आरोपीची गाडी अडवली आणि पीडितेची सुटका केली. मात्र, संतापलेल्या नागरिकांनी या आरोपीला चांगलाच चोप दिला. तेव्हा हा तरुण भाईगिरीतील काही लोकांची नाव सांगून नागरिकांनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु नागरिक आणखीच संतापले. त्यांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

या घटनेमुळे बाहेर गावाहून यवतमाळ शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विध्यार्थिंनीमध्ये दहशत निर्माण झाली आहे. असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण निस्तारण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. पीडितेच्या आई-वडिलांवर दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 10:59 AM IST

ताज्या बातम्या