सख्खे भाऊ निघाले पक्के वैरी.. अल्पवयीन बहिणीचे अपहरण करून केला बलात्कार

सख्खे भाऊ निघाले पक्के वैरी.. अल्पवयीन बहिणीचे अपहरण करून केला बलात्कार

कळमेश्वर तालुक्यातील चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच गंगापूर-टाकळघाट येथे बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

नागपूर,9 डिसेंबर:कळमेश्वर तालुक्यातील चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच गंगापूर-टाकळघाट येथे बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन बहिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने खळबळ माजली आहे. आकाश संजय कारमोरे (वय 27) व शुभम संजय कारमोरे (वय 21, दोघेही गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट) या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, 14 वर्षीय पीडिता मूळची भंडारा जिल्ह्यातील लाखनीची आहे. आई आणि वडील विभक्त असल्याने आई बुटीबोरी परिसरातील टेंभरी येथे राहाते व एका विश्रामगृहात मजूरी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलगी लाखनी येथे शिकत असून दिवाळीच्या सुटीत ती आईकडे आली होती. आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला व गोडीगुलाबीने बोलून तिला आमिषे दाखवले. मुलगी आमिषांना भूलल्याने आकाशने तिला पळवून नेले. दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी तिला शोधून पोलिस ठाण्यात आणले.

महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आकाशने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. तसेच आकाशने तिला गंगापूर येथील त्याच्या मामाकडे ठेवल्याचे सांगितले. आकाशने पीडितेला आई वडील नसल्याचे कारण मामाला सांगितले होते. तिथे शुभमनेही तिच्याशी शरीर संबंध ठेवल्याचे सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी भादंवि कलम 363, 366 व 376 नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.

'पोर्नोग्राफी, सामूहिक बलात्कार कसा करायचा याच्या व्हिडिओचा भारतात मोठा व्यापार'

कळमेश्वर तालुक्यातीस लिंगा गावात 6 वर्षीय चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी 'कळमेश्वर बंद'ची हाक दिली आहे. चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कळमेश्वरमध्ये सर्व दुकान बंद करण्यात आली आहे. आरोपी संजय पुरीला आमच्या ताब्यात द्या, फाशी किंवा त्याचा एन्काऊंटर करा (हैदराबादप्रमाणे) अशी मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तिव्र प्रतिक्रिया दिला आहे.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नागपूरचे पोलिस निरीक्षकांशी या प्रकरणी फोनवर चर्चा झाली आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा, यादृष्टीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. डीएनए (DNA)करण्यासाठी पोलिसांना सुचवले आहे. ज्या मुली प्रतिकार करू शकत नाही. अशा मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याच्या घटनामध्ये राज्यात वाढ झाली आहे. वाशिमलाही अशीच एक घटना घडली आहे.

व्हिडिओचा भारतात मोठा व्यापार..

पोर्नोग्राफी आणि सामूहिक बलात्कार कसा करायचा, याच्या व्हिडिओचा मोठा व्यापार भारतात होत आहे. त्यामुळेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. यापाश्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन दिल्याचे नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. त्यात सर्व द्रुतगती मार्गावर ऑनलाइन देखरेख झाली पाहिजे. एखाद्या रस्त्यावर मुलीची छेडछाड होत असेल, असे दिसले की लगेच तिला मदत मिळायला हवी. अत्याचाराच्या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागायला हवा. त्याच्यात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या मुली अशा घटनानंतर बचावल्या आहेत त्यांना साक्षीदार संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण द्यायला हवे, तसेच उत्तर प्रदेशातील उन्नावसारखी घटना महाराष्ट्रात होणार नाही, याबाबतही काळजी घ्यायला हवी, असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 09:26 PM IST

ताज्या बातम्या