नागपूर, 11 सप्टेंबर: 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर गावाजवळील स्मशानभूमीत चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात ही घटना आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले..
याप्रकरणी पोलिसांनी अमित ठाकूर (वय-18), बलवंत गोंड (वय-22) यांच्यासह दोन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर बलवंत गोंड अद्याप फरार आहे. दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले असल्याची माहिती मिळाली आहे.
शौचास गावाबाहेर गेली होती पीडिता..
मिळालेली माहिती अशी की, रविवारी (8 सप्टेंबर) रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परतत असताना गावातील चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. नंतर तिला गावात आणून सोडले.
नागपुरात 4 वर्षाच्या चिमुरड्यासह आईचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून
दरम्यान, नागपूर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 4 वर्षाच्या चिमुरड्यासह आईचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकात प्रियांका दिनेश शाहू (25) आणि अंशुल दिनेश शाहू (4) या मायलेकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
मूळ बिहारचे असलेले दिनेश शाहू हे पत्नी प्रियांका आणि मुलगा अंशुल यांच्यासह नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकात नारायण वानखेडे यांच्या घरात भाड्याने राहत होते. दिनेश यांच्या घरी गणपती असूनही अंधार कसा दिसतोय. यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता प्रियांका आणि अंशुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तर जवळच रक्ताने माखलेला बत्ताही आढळून आला. दरम्यान, मागील 15 दिवसांपासून मूळ बिहारचा असलेला रवी नावाचा तरुण त्यांच्यासोबत राहायला आला होता. रवी बेपत्ता असल्यामुळे त्यानेच हे हत्याकांड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पतीचीही चौकशी...
पत्नी आणि मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पती दिनेश यांचीही चौकशी सुरु आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
SPECIAL REPORT:'आरे'तील कारशेडला शिवसेनेचा 'ना रे'!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा