Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते, बच्चू कडूंचा पलटवार

उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते, बच्चू कडूंचा पलटवार

'भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे तो त्यांनी दाखवून दिला आहे.'

अमरावती 20 ऑक्टोबर: सरकार चालवायला दम लागतो अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जेव्हा राज्यात फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे यांचाच दम होता त्यामुळे त्यांना दम विचारण्याचा काहीच विषय नाही. उद्धव ठाकरेंचा दम त्यांना नसता तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नसते असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे तो त्यांनी दाखवून दिला आहे. कोरोना संकटासह नैसर्गिक संकटावर ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी मात केली, हे दम असल्याशिवाय शक्य नाही. सत्ता गेल्यानं देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झालेत, त्यांनी संयम ठेवायला पाहिजे.' काय म्हणाले फडणवीस? निकषात बसत नाही, नियमात बसत नाही अशी कारणं देऊन चालणार नाही. शेतकऱ्यांला उडवाउडवीचे उत्तर देऊ नका नियमात बसत नसेल तर नियम बदला राज्यकर्त्यांनी खंबीर भूमिका घेणे गरजेच असतं असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा केला आहे. राज्य सरकार कारण सांगत आहे, केंद्र मदत करत नाही, पैसे दिले नाही, अनेक जिल्हयात हजारो कोटींची बांधकामं सुरू आहेत त्यासाठी पैसा आहे मात्र शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील तेव्हाच कारणं दाखवत आहेत असा आरोपही त्यांनी केला. ‘शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊ नका, नियम बदला’; फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल केंद्राची मदत येईल मात्र त्याआधी राज्य सरकारने थेट मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.  ते बीड मधील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करताना बोलत होते. सरकार चालवायला दम लागतो असंही त्यांनी म्हटलं आहे. पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, मका आणि फळबागांचे पूर्णपणे अतोनात नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे उद्या रब्बीची पेरणी करताना सुद्धा शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे अशा परिस्थिती मध्ये तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही अपेक्षा आहे. मोठी बातमी : फक्त महिला नाही सगळ्यांसाठी लोकल सुरू होणार? उद्या 11 वाजता बैठक ज्या ठिकाणी ऊस झोपला आहे त्या ठिकाणी पंचनामे होत नाहीत. सरकार सांगतं निकषात बसत नाही असं कसं निकषात बसत नाही, निकषात बसवावं लागतं. पीक वाहून गेलं हे निकषात बसत नाही अस म्हणून कसं चालेल.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Devendra Fadnavis, Uddhav tahckeray

पुढील बातम्या