पतीचे होते अनैतिक संबंध.. नागपुरात विवाहितेची आत्महत्या

पतीच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 04:22 PM IST

पतीचे होते अनैतिक संबंध.. नागपुरात विवाहितेची आत्महत्या

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,21 सप्टेंबर: पतीच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. जयश्री विक्रम नारनवरे (वय- 30) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला तिचा पतीच जबाबदार असल्याची तक्रार जयश्रीच्या आईने नोंदवल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विक्रम नारनवरेला अटक केली. आरोपी विक्रम नारनवरेचे जयश्रीसोबत 2015 मध्ये लग्न झाले होते. त्याच्याकडे एका मोबाइल कंपनीच्या सीमकार्डची एजन्सी आहे. काही महिन्यांपासून विक्रमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयश्रीला होता. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

टोचून बोलायचा...

जयश्री आणि विक्रममध्ये नेहमी वाद व्हायचे. विक्रम तिला मारहाणही करत होता. तिला कायम टोचून बोलत होता. त्याच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे विक्रमने चार महिन्यांपूर्वी वडिलांचे घर सोडून हुडकेश्वरमधील महालक्ष्मी नगरात भाड्याचे घर घेतले होते. तेथे हे दोघेच राहत होते. नेहमीप्रमाणे विक्रम दुपारच्या सुमारास घरी परत आला असता त्याला जयश्री सिलिंग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नातेवाईकांनाही कळवले. जयश्रीला खाली उतरवून हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी जयश्रीच्या घरी जाऊन तिच्या रूमची झडती घेतली असता एक सुसाईड नोट मिळाली.

विक्रमचे दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे आणि त्याच्याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याने जयश्रीने या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे, असे हुडकेश्वरचे ठाणेदार संदीप भोसले यांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी विक्रमविरुद्ध कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करून विक्रमला अटक केली आहे.

Loading...

पुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...