माओवाद्यांनी तरुणाला घातल्या गोळ्या, मृतदेह फेकला घोटपाळीच्या जंगलात

माओवाद्यांनी तरुणाला घातल्या गोळ्या, मृतदेह फेकला घोटपाळीच्या जंगलात

तरुणाच्या मृतदेहावर माओवाद्यांनी ठेवलेल्या एका पत्रकावर दलु परसा असे नाव लिहिले होते

  • Share this:

महेश तिवारी,(प्रतिनिधी)

गडचिरोली,20 डिसेंबर: माओवाद्यानी गोळ्या घालून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तरुणाचा मृतदेह धोडराज-घोटपाळी दरम्यानच्या जंगलात फेकून देण्यात आला होता. एवढेच नाही तर तरुणाच्या मृतदेहावर नक्षल पत्रकेही ठेवण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरागड येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. दलु परसा अशी मृत तरुणाची ओळख पटली आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

या संशयातून केली हत्या...

तरुणाच्या मृतदेहावर माओवाद्यांनी ठेवलेल्या एका पत्रकावर दलु परसा असे नाव लिहिले होते. तो एसपीओ म्हणून पोलिसाकरता काम करत असल्याचे नमूद केले आहे. सदर मृत तरुण कोणत्या गावाचा रहिवासी आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस पुढील तपास करत आहे.

माओवाद्यांचा कट उधळला, रस्त्यात पेरला होता क्लेमोर माईन बॉम्ब

क्लेमोर माईन बॉम्बचा स्फोट घडवून मोठी हल्ला करण्याचा कट गडचिरोली पोलिसांनी गेल्या आठवड्यात उधळला. माओवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करण्यासाठी रस्त्यात क्लेमोर माईन बॉम्ब पेरला होता. वेळीच घटनास्थळी पोहोचून बॉम्ब निकामी करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. क्लेमोर माईन बॉम्बमध्ये बस उडवण्याची क्षमता होती.

माओवाद्यांनी पोलिस दलाला टार्गेट करण्याच्या हेतूने भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी-धोडराज रस्त्यावर सुमारे 15 किलोग्रॅम वजनाचा क्लेमोर माईन बॉम्ब पेरला होता. पोलिसांनी राबवलेल्या शोध अभियानात हा बॉम्ब आढळून आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी स्फोटके निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 08:06 PM IST

ताज्या बातम्या