जहाल माओवाद्याचं समर्पण, 20 लाखांचं बक्षीस आणि 149 गुन्ह्यांची नावावर नोंद

जहाल माओवाद्याचं समर्पण, 20 लाखांचं बक्षीस आणि 149 गुन्ह्यांची नावावर नोंद

तो वीस वर्षापासून माओवादी चळवळीत आहे. मरकेगाव आणि हत्तीगोटा या दोन मोठया घटनेत सहभागी होता त्या दोन्ही घटनेत 29 जवान शहीद झाले होते.

  • Share this:

गडचिरोली 28 फेब्रुवारी : जहाल माओवादी विलास उर्फ दसरु याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. विलास कोल्हा हा माओवाद्याच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा कमांडर इन चीफ असुन सगळया हिंसक घटनाचे नेतृत्व विलास कोल्हाने केले आहे. विलासवर 149 गुन्हे दाखल असुन त्यात हत्येचे तीस गुन्हे तर पोलिंसावर हल्ले करणाऱ्या चकमकीचे 40 गुन्हे दाखल आहेत. दोन राज्यात मिळुन वीस लाखांचे बक्षीस विलासवर आहे. तो वीस वर्षापासून माओवादी चळवळीत आहे. मरकेगाव आणि हत्तीगोटा या दोन मोठया घटनेत सहभागी होता त्या दोन्ही घटनेत 29 जवान शहीद झाले होते. मुरमुरीच्या घटनेत सात जवान शहीद झाले होते. त्यातही विलास कोलाचा सहभाग होता.

गेल्या 1 मे रोजी कुरखेडा लगत झालेल्या स्फोटात सोळा पोलीस शहीद झाले त्या स्फोटाच्या घटनेचा पाया रचण्यासाठी दादापूर येथे वाहनांची जाळपोळ विलास कोल्हाच्या नेतृत्वात झाली होती.

माओवादी पुन्हा एकदा सुरक्षा दलाला टार्गेट करण्याची शक्यता गुप्तचर सूत्रांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. गेल्या महिन्यांपासून सुरक्षा संस्था माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असून सुरक्षा दलांवर हल्ल्याचा एक मोठा कट उघडकीस आला होता. यात माओवादी तीन मोठे स्फोट करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी IED ब्लास्ट करण्याची योजना तयार केली होती. हा कट उघडकीस आला असून सुरक्षा दल सतर्क झालंय. या आधीही सुरक्षा दलांनी माओवाद्यांचे अनेक कट उघडकीस आणले आहेत. हा कट उघडकीस आल्याने सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईचा फेरआढावा घेतला आहे.

कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक धोकादायक, पत्रा कोसळून गाडीचालक जखमी

छत्तीसगडमधल्या बीजापूर इथं हे स्फोट घडविण्याची माओवाद्यांची योजना होती. इथल्या गंगालूर साप्ताहिक बाजारात माओवादी हा स्फोट घडविणार होते. यासाठी त्यांनी तीन IED ब्लास्ट घडवून आणण्याची योजना (IED Bomb Plant) तयार केली होती. काही महिन्यांपूर्वी हे बॉम्ब सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.

Apple च्या भारतातील ग्राहकांसाठी खूशखबर! कंपनीचे CEO नी केली मोठी घोषणा

आठवडी बाजारात बॉम्ब ब्लास्ट करून दहशत घडवून आणण्याचीही त्यांची योजना होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. सगळा परिसर पिंजून काढण्यात येत असून सुरक्षा दलं सर्व खबरदारी घेत आहेत. या आधी दंतेवाडा इथं पोलिसांनी एक टिफीन बॉम्ब जप्त केला होता. पोटाली पटेल पारा मार्गावर तब्बल 7 किलोंचा हा बॉम्ब प्लांट करून ठेवला होता.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2020 03:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading