खळबळजनक : आत्मसमर्पण केलेल्या दोघांवर माओवाद्यांचा हल्ला, एकाचा मृत्यू

खळबळजनक : आत्मसमर्पण केलेल्या दोघांवर माओवाद्यांचा हल्ला, एकाचा मृत्यू

राज्यात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दहशत पसरविण्यासाठी आणि चळवळीतून फुटून निघणाऱ्यांसाठी हा इशारा असल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली11 सप्टेंबर : माओवादी चळवळीतून फुटून बाहेर पडलेल्या आणि आत्मसमर्पण केलेल्या दोन तरुणांवर माओवाद्यांनी भ्याड हल्ला केलाय. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या तरुण जखमी झालाय. त्याला गडचिरोलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या आधीही माओवाद्यांनी अशा प्रकारचे हल्ले केले आहेत. राज्यात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दहशत पसरविण्यासाठी आणि चळवळीतून फुटून निघणाऱ्यांसाठी हा इशारा असल्याचं बोललं जातंय. अशोक होडी रा. जारेवाडा आणि मधुकर मट्टामी रा. नैनवाडी अशी या दोन तरुणांची नावं आहे. हे दोघही गडचिरोलीवरून वैयक्तिक कामासाठी एटापल्ली तालुक्यातील जारेवाडा येथे गेले होते. तिथून परत येत असतांना माओवाद्यांच्या अ‍ॅक्शन टीमने दोघांवरही केला गोळीबार केला.

वाचा: राज ठाकरेंबद्दल अजित पवारांचं खळबळजनक विधान, म्हणाले ' ED चौकशी झाल्यापासून...'

माओवाद्यांच्या या हल्ल्यात मधुकरचा मृत्यू झाला तर अशोक जखमी झाला. यात अशोक होडी यांना दोन गोळ्या लागल्याने तो जखमी झाला. त्याला हॅलीकॉप्टरने  गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

तरुणांनी केली माओवाद्यांना गावबंदी

गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा येथील स्फोटात मे महिन्यात माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात पंधरा जवान शहीद झाले होते. या घटनेत पोलिसांनी लेवारी येथील तरुणांना अटक केली होती. आता त्या लेवारी गावच्या नागरिकांनी माओवाद्याच्या विरोधात एल्गार पुकारलाय. तरुणांनी आक्रमक भूमिका घेत माओवाद्यांनी घातपातासाठी  गावातल्या तरुणांचा वापर केल्याचा गंभीर आरोप केलाय. यापुढे त्यांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा दिलाय.

वाचा: निवडणुकीपूर्वीच कलगीतुरा... शिवसेनेच्या या मंत्र्यावर जादूटोणा केल्याचा आरोप

गेल्या एक मे रोजी कुरखेड्याजवळ माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात पंधरा जवान शहीद झाले होते या घटनेच्या तपासात लेवारी येथील काही तरुणांना पोलीसानी अटक केली होती. आज या गावच्या नागरीकांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन माओवाद्यांबद्दल रोष व्यक्त केला.

गावातल्या तरुणांची चूक झाली असुन माओवाद्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी या तरुणांचा वापर केल्याचा आरोप केला. यापुढे या गावात माओवाद्यांना कुठलीही मदत मिळणार नसुन त्यांना गावबंदी केली जाईल असं गावकऱ्यांनी पोलिसांसमोर स्पष्ट केलंय.

वाचा: भाजपनंतर MIM कडून राष्ट्रवादीला शह, नेत्याला पक्षात घेत उमेदवारीही केली जाहीर

गडचिरोलीत माओवादी तरुणांना भडकवून त्यांना पोलिसांविरुद्ध लढायला भाग पाडतात. विकासाचा अभावामुळे परिसरात रोजगाराच्या संधी नाहीत त्यामुळं हे तरुण मावाद्यांच्या प्रचाराला बळी पडतात. तर पोलीस अशा तरुणांवर कारवाई करतात. त्यामुळे या संघर्षाचा तरुणांना मोठा फटका बसतोय. एकदा माओवाद्यांच्या कळपात गेल्यानंतर तिथून बाहेर पडणं हे अशक्य असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 03:09 PM IST

ताज्या बातम्या