High Alert सुरक्षा दलांवर 'ड्रोन'ने हल्ल्याचा माओवाद्यांचा प्लान

High Alert सुरक्षा दलांवर 'ड्रोन'ने हल्ल्याचा माओवाद्यांचा प्लान

ड्रोनला लक्ष्य करून खाली पाडण्याची तयारी सुरु होताच ड्रोन आकाशात बेपत्ता झाले. असा प्रकार तीन दिवसात चारवेळा घडला आहे.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली 21 नोव्हेंबर : माओवाद्यांकडून आता सुरक्षा दलाच्या विरोधात नवी रणनीती समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा चक्रावुन गेल्या आहेत. सुरक्षा दलाच्या कॅम्पची रेकी आणि हल्याच्या योजनेसाठी माओवाद्याकडून ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं उघड झालंय. त्यामुळे दंडाकरण्यात सर्तकतेचा इशारा सुरक्षा दलाने दिलाय. असे ड्रोन दिसताच थेट कारवाईचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.सुकमा आणि काश्मीरनंतर देशात सर्वाधिक हिंसक कारवाया असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवाया असलेल्या या जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाच्या कॅम्पजवळ लाल आणि पांढरा प्रकाश पसरवणारे ड्रोन उडताना दिसले. ड्रोनची उपस्थिती आणि आवाजानंतर शिबिरात असलेल्या जवानांनी तात्काळ सावधानतेचा इशारा देऊन कॅम्पमध्ये असलेल्या जवानांना सावध केलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत, मात्र फॉर्म्युला अजुनही गुलदस्त्यात

त्या ड्रोनला लक्ष्य करून खाली पाडण्याची तयारी सुरु होताच ड्रोन आकाशात बेपत्ता झाले. असा प्रकार तीन दिवसात चारवेळा घडला आहे. केंद्रीय राखीव दल माओवाद्याच्या कारवाया असलेल्या महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि झारंखडमध्ये तैनात असून स्थानीक पोलीस दलासोबत अभियानात निमलष्करी दलाचे जवान सहभागी होत असतात. माओवाद्यांनी या निमलष्करी दलाच्या शिबिरांनाच ड्रोनच्या मार्फत लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं सुरक्षा दलांनी चौकशी सुरू केलीय.

ज्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाच्या जवानाच्या शिबीरावर हे ड्रोन आले तो परिसर चार राज्याच्या सीमावर्ती भाग आहे या भागात रस्ते वीज मोबाईलसह कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत तसेच माओवाद्याच्या सतत हालचाली असलेला हा भाग असून घातपात घडवून माओवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. त्यामुळे ड्रोनच्या वापरातून शिबिरांची भौगोलीक परिस्थिती तसेच सुरक्षा दलाच्या हालचालीची माहीती घेण्याचा माओवाद्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातय.

सत्तास्थापनेचं केंद्र दिल्लीतून मुंबईत, काँग्रेसच्या नेत्यांसाठी विशेष विमान

माओवाद्यांच्या विरोधात गेल्या चार वर्षात दंडकारण्यात सुरक्षा दलांनी आक्रमक अभियान राबवल्याने माओवादी चळवळ बॅकफुटवर गेलीय. त्यामुळे नव्या पध्दतीने थेट केंद्रीय निमलष्करी दलाला लक्ष्य करण्याच्या माओवाद्याच्या प्रयत्नाची सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या