मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीत नागपुरातील जवान मंगेश रामटेके शहीद

नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीत नागपुरातील जवान मंगेश रामटेके शहीद

गेल्या 48 तासांपासून गडचिरोली पोलिसांतील सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

गेल्या 48 तासांपासून गडचिरोली पोलिसांतील सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

गेल्या 48 तासांपासून गडचिरोली पोलिसांतील सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

गडचिरोली, 5 मार्च : गेल्या 48 तासांपासून गडचिरोली पोलिसांतील सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. यामध्ये एक दु:खद बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ITBT चे जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगेश रामटेके असं जवानाचं नाव आहे. मंगेश रामटेके नागपुरातील रहिवासी आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात नारायणपूर कोहकामेटा मार्गावर नक्षलवाद्यांनी आयडी ब्लास्टचा स्फोट घडवला. यात ITBT च्या 53 व्या बटालियनच्या मंगेश रामटेके हे जवान शहीद झाले आहेत. मंगेश नागपूर येथील रहिवासी आहेत. (Mangesh Ramteke a jawan from Nagpur was martyred in Explosion of Naxals)

दरम्यान नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या एक जवानाला उपचारासाठी नागपूरात हलविण्यात आलं आहे. कोपर्शीच्या जंगलात झालेल्या चकमकीत मोहन उसेंडी हा जवान जखमी झाला होता. कोठी येथून उपचारासाठी त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आलं आहे. सध्या नागपूरात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा-गडचिरोली पोलिसांना मोठं यश;नक्षलवाद्यांच्या शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील (Maharashtra-Chhattisgarh border) गडचिरोली पोलिसांच्या (Gadchiroli Police) सी-60 कमांडोच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अभियानात शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या शस्त्रांस तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचं युनिट (कारखाना) नष्ट केलं आहे. गडचिरोली रेंजचे पोलीस उपमहानिर्देशक संदीप पाटील यावर म्हणाले की, छत्तीसगड सीमेजवळील तब्बल 5 किलोमीटर आत माड भागात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या संघर्षात एक जवान जखमी झाला आहे. (Great success for C 60 commandos of Gadchiroli police Naxal weapons manufacturing unit destroyed ). ते पुढे म्हणाले की, पोलीस दलाच्या मदतीसाठी एक हेलिकॉप्टर रवाना करण्यात आलं आहे. येथील माओवाद्यांच्या शस्त्रास्त्र तयार करणारा कारखाना नष्ट करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Gadchiroli, Nagpur